भारत पेट्रोलियमचा विजेतेपदावर कब्जा

By admin | Published: May 17, 2015 01:10 AM2015-05-17T01:10:42+5:302015-05-17T01:10:42+5:30

कबड्डी स्पर्धेत बलाढ्य भारत पेट्रोलियमने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेचा २६-११ असा दारुण पराभव करून सहजपणे विजेपदाला गवसणी घातली.

Bharat Petroleum captains winner | भारत पेट्रोलियमचा विजेतेपदावर कब्जा

भारत पेट्रोलियमचा विजेतेपदावर कब्जा

Next

मुंबई : वेलिंग्टन कॅथलिक जिमखानाच्या वतीने झालेल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत बलाढ्य भारत पेट्रोलियमने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेचा २६-११ असा दारुण पराभव करून सहजपणे विजेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदासह भारत पेट्रोलियमने रोख १ लाख रुपयांच्या बक्षिसावरदेखील कब्जा केला; तर उपविजेत्या पश्चिम रेल्वेला ७५ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहिलेल्या पश्चिम रेल्वेला रोखण्यात भारत पेट्रोलियम यशस्वी झाली. पश्चिम रेल्वेच्या सुनील कुमारने एका चढाईत २ गडी टिपून संघाला ३-२ व त्यानंतर ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र वेळीच भारत पेट्रोलियम ४-४ अशी बरोबरी साधून ‘अभी खेल बाकी है’ असा इशारा दिला. रेल्वेचा हुकमी एक्का सुनील कुमारला या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. भारत पेट्रोलियमने चढाई व क्षेत्ररक्षण या दोन्ही बाजूंत उत्कृष्ट कामगिरी करून रेल्वेला उभारी घेण्याची संधीच दिली नाही.
भारत पेट्रोलियमच्या नितीन मदनेने एकाच चढाईत ३ गडी टिपले. भारत पेट्रोलियमने २ लोण चढवताना फक्त १ बोनस गुणाची कमाई केली. रेल्वेने ५ बोनस गुणांची कमाई केली.

वैयक्तिक विजेते :
च्सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू : नीलेश शिंदे (भारत पेट्रोलियम)
च्सर्वोत्कृष्ट पकड :
पवन चिल्लर (पश्चिम रेल्वे)
च्सर्वोत्कृष्ट चढाई :
सुनील कुमार (पश्चिम रेल्वे)

दहावे विजेतेपद!
भारत पेट्रोलियमचे यंदाच्या मोसमातील हे १०वे विजेतेपद ठरले. यंदाच्या मोसमात आंतर पेट्रोलियम स्पोटर््स प्रमोशन बोर्डाची अखिल भारतीय स्पर्धा जिंकून धडाक्यात सुरुवात केल्यानंतर भारत पेट्रोलियमने संकल्प, बंगळुरू महापौर, बद्रा अखिल भारतीय, बाळासाहेब ठाकरे स्मृती, आमदार चषक, आरसीएफ, गजानन, मुंबई महापौर आणि वेलिंग्टन जिमखाना स्पर्धेत दबदबा राखला.

किशोर गटात संघर्ष क्रीडा मंडळाची बाजी
किशोर गटात गोरेगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने चुरशीच्या अंतिम सामन्यात सह्याद्रीचे कडवे आव्हान ५३-४८ असे परतावून बाजी मारली. अभिषेक सोलंकी, हृतिक तरळनी यांचा दमदार खेळ संघाच्या विजेतेपदात निर्णायक ठरला.

Web Title: Bharat Petroleum captains winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.