भुवी, वरुण, शमी प्रभावी ठरतील
By admin | Published: November 27, 2014 12:44 AM2014-11-27T00:44:47+5:302014-11-27T00:44:47+5:30
क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धच्या सराव सामन्यात सुरेख गोलंदाजी करणारे वरुण अॅरोन, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी हे गोलंदाज कसोटी मालिकेत प्रभावी ठरतील,
Next
एडिलेड : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धच्या सराव सामन्यात सुरेख गोलंदाजी करणारे वरुण अॅरोन, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी हे गोलंदाज कसोटी मालिकेत प्रभावी ठरतील, असे मत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रियान कार्टर्स याने व्यक्त केले आह़े आपला फॉर्म कायम राखण्यासाठी या खेळाडूंनी आपल्या फिटनेसवर लक्ष द्यावे, असा सल्लाही त्याने दिला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणा:या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी अॅरोन, भुवनेश्वर व शमी यांनी सराव सामन्यात सुरेख गोलंदाजी करून सर्वाचे लक्ष वेधले आह़े आता कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे या खेळाडूंनी सिद्ध केले आह़े
ऑस्ट्रेलिया एकादश संघाचा सलामवीर फलंदाज रियान कार्टर्स म्हणाला, ‘‘वरुण अॅरोन याने सराव सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली़ याबद्दल तो कौतुकास पात्र आह़े त्याने आपल्या गोलंदाजीत काही चांगले बाउंसरही टाकल़े त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याच्यापासून सावध राहावे लागेल़’’
भुवनेश्वरबद्दल कार्टर्स म्हणाला, ‘‘हा भारतीय गोलंदाज जास्त वेगवान गोलंदाजी करीत नाही; मात्र आपल्या स्विंगच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणतो़ खेळपट्टी जर स्विंग गोलंदाजांना साथ देणारी ठरली, तर तो घातक ठरू शकतो़ शमीविरुद्धही ऑस्ट्रेलियाला काळजी घ्यावी लागेल़ सध्या भारतीय वेगवान गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े जर भारताला पुढील काही महिने उत्कृष्ट कामगिरी कारायची असेल, तर या गोलंदाजांचा फिटनेस कायम राखणो गरजेचे आहे, असेही तो म्हणाला़
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध भारताचा दुसरा सराव सामना शुक्रवारी होईल़ भारतीय संघाने या सराव सामन्यापूर्वी पूर्ण दिवस नेटमध्ये सराव करण्यावर भर दिला़ या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी पंचाची भूमिका निभावली़ भारतीय खेळाडू मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, यांनी वेगवान व फिरकी गोलंदाजांचा सामना केला़ गोलंदाजीत ईशांत शर्मा, भुवनेश्वर, मोहंमद शमी, आऱ आश्विन, कर्ण शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या खेळावर मेहनत घेतली़ (वृत्तसंस्था)