राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे यश :१९ एकोणीस पदके पटकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 08:29 PM2017-11-09T20:29:04+5:302017-11-09T20:32:43+5:30

Bhoir Gymkhana's success at Dombivli, 19 nineteen bronze medals: State Inter-School Gymnastic Competition | राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे यश :१९ एकोणीस पदके पटकावली

राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे यश :१९ एकोणीस पदके पटकावली

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्राच्या संघातही चौघांचा समावेश कलकत्ता येथे होणार आगामी स्पर्धा

डोंबिवली : मुंबई महाराष्ट्र क्रीडा व युवक संचनालाय आयोजित राज्यस्तरीय आंतर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा औरंगाबाद येथे १ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. त्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील ५०० खेळाडूनी भाग घेतला होता. त्यात डोंबिवलीतील भोईर जिमखान्याच्या सात स्पर्धकांनी १३ सुवर्णपदक, ५ रौप्य व एक कांस्य असे एकूण १९ एकोणीस पदके पटकावली.
ओमकार शिंदे याने १९ वर्षे खलील मुलांमध्ये उकृष्ठ कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मनेश गाढवे याने १७ वर्षे खलील मुलांमध्ये सर्वसाधारण रोप्य पदक मिळवले. १४ वर्षांखालील गटात नवोदित पार्थ घूगरे याला देखिल यश मिळाले. निषाद जोशी, जयेश पाटील, हिमांशू म्हात्रे व मयुरीआईर यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक मिळवून मुंबई विभागीय पदक तालिकेत योगदान वाढवले. या स्पधेर्तुन महाराष्ट्राचा संघ निवडला गेला, त्यामध्ये कलकत्ता येथे होणा-या आंतर शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात भोईर जिमखान्याच्या मनेश गाढवे , ओमकार शिंदे ( कर्णधार) , मनेश गाढवे मयुरी आईर आणि हिमांशू म्हात्रे या खेळाडूंची निवड झाली असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मुकुंद भोईर आणि पवन भोईर यांनी दिली.

Web Title: Bhoir Gymkhana's success at Dombivli, 19 nineteen bronze medals: State Inter-School Gymnastic Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.