रोमहर्षक हॉकी सामन्याचे भुवनेश्वर ठरले साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:29 AM2020-03-01T05:29:12+5:302020-03-01T05:29:25+5:30

बंगलोर विद्यापीठ यांच्यात अत्यंत रोमहर्षक खेळ पाहायला मिळाला. यावेळी हॉकी खेळाविषयी या शहरात असलेली लोकप्रियता अनुभवता आली.

Bhubaneswar witnesses romance hockey match | रोमहर्षक हॉकी सामन्याचे भुवनेश्वर ठरले साक्षीदार

रोमहर्षक हॉकी सामन्याचे भुवनेश्वर ठरले साक्षीदार

Next

- धनराज पिल्ले लिहितात...
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात बंगलोरसेंट्रल विद्यापीठ आणि बंगलोर विद्यापीठ यांच्यात अत्यंत रोमहर्षक खेळ पाहायला मिळाला. यावेळी हॉकी खेळाविषयी या शहरात असलेली लोकप्रियता अनुभवता आली. बंगलोरहे शहर अनेक पिढ्यांपासून भारतीय हॉकीपटूंचे आवडीचे शहर राहिले. यात बंगलोरलीग तसेच राष्टÑीयस्तरावरील आयोजनाशिवाय साईच्या केंगरी येथील क्रीडासंकुलात आयोजित होणाऱ्या शिबिरांचाही समावेश आहे.
कर्नाटकने देशासाठी दमदार कामगिरी करणाºया खेळाडूंना अनेक दशकांपासून प्रोत्साहन दिले. देशभरातील आघाडीचे संघ बंगलोरलीगमध्ये आवडीने सहभागी होतात. त्यात इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, आर्मी इलेव्हन आदींचा समावेश आहे. येथील साई सेंटर आॅफ एक्सलन्स हा संघ तर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह आंतरराष्टÑीय दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध नेहमी दोन हात करतो.भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये ज्युड फेलिक्स, आशिष बल्लाळ, एबी सुबय्या, ड्रॅग फ्लिकर लेन अयप्पा, अर्जुन हलप्पा, साबू वर्के, अनिल एल्ड्रिन, संदीप सोमेश, व्ही. एस. विनय, आदींचा समावेश आहे.
खेलो विद्यापीठ स्पर्धेबाबत सांगायचे तर अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गाजला. दोन्ही संघ भुवनेश्वरमध्येही खेळ भावनेने खेळले. हॉकीचे माहेरघर असलेल्या भुवनेश्वरमध्ये खच्चून भरलेल्या प्रेक्षकांपुढे प्रेक्षणीय कामगिरी करण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूंमध्ये जाणवली. यावेळी उपस्थित असलेले देवेश चौहान आणि दीपक ठाकूर यांनी राष्टÑीय स्तरावर खेळण्यायोग्य चेहºयांचा शोध घेतला असेल.
बंगलोरसेंट्रल विद्यापीठाने हा थरार जिंकला. या संघाचा कर्णधार राहिल मोहम्मद याने आंतरराष्टÑीय स्तरावर ज्युनियर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. बेल्जियममधील पाच देशांच्या स्पर्धेत त्याने भारतीय तिरंग्याची शान उंचावली होती. प्रेक्षकांची मने जिंकणाºया अन्य खेळाडूंमध्ये हरेश सोमप्पा, सी. एस. शामानाथ, यतीश कुमार, ए. सी. सुब्रमणी यांचा समावेश आहे.
महिलांचा अंतिम सामना एमआयटी विद्यापीठ ग्वाल्हेर आणि संबलपूर विद्यापीठ ओडिशा यांच्यात गाजला. संबलपूरने ही लढत मोठ्या फरकाने जिंकली. ग्वाल्हेर आणि ओडिशा महिला हॉकीसाठी प्रसिद्ध आहेत. विशेषत: मध्य प्रदेश क्रिकेट अकादमी आणि ओडिशातील सुंदरगड ही ठिकाणे या खेळासाठीच प्रसिद्ध आहेत. भारतीय हॉकीला ओडिशाच्या रुपात नवे घर लाभले. त्यात राज्य शासनाचा मोठा वाटा आहे. त्यांनी अन्य राज्यांना खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढकार घ्यावा अशी प्रेरणा दिली. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा ही ओडिशाच्या मुकुटात मानाचा तुरा रोवणारी ठरावी. यानिमित्त पालकांना माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या मुलांमध्ये खेळाप्रती रुची निर्माण करावी. भविष्यातील प्रख्यात खेळाडू तुमच्या घरातूनही निघू शकतो.

Web Title: Bhubaneswar witnesses romance hockey match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.