IPL: भुवनेश्वरची पर्पल कॅप जाणार? या खेळाडूकडे सुरेख संधी
By Admin | Published: May 21, 2017 12:47 PM2017-05-21T12:47:57+5:302017-05-21T12:48:58+5:30
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर स्टीव्ह स्मिथच्या रायझिंग पुणेचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघाचा जलदगती गोलंदाज जयदेव उनादकटकडे या सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्याला आझच्या सामन्यात अचूक आणि सुरेख गोलंदाजी करावी लागले.
सध्या सर्वाधिक विकेट सनराइझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहेत. 14 सामन्यांमध्ये 26 विकेट घेऊन त्याने पर्पल कॅप आपल्याकडे राखली आहे. दुसरीकडे उनाडकटने केवळ 11 सामने खेळले आहेत. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली नव्हती. त्याने 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने मुंबईच्या 4 विकेट घेतल्या तर तो भुवनेश्वरची बरोबरी करू शकतो, आणि सरासरीच्या बळावर पर्पल कॅपचा तो मानकरी ठरू शकतो.
हैदराबादचा संघ याआधीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे उनाडकटला ही सुरेख संधी आहे. तर अंतिम सामन्यात पोहोचलेल्या मुंबईकडून मिशेल मॅक्लेघन हा 14 सामन्यात 19 विकेट घेऊन तिस-या स्थानावर आहे तर जसप्रित बुमराहने 15 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.
आजचे संघ:
रायझिंग पुणे सुपरजायंट-
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), राहुल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), मनोज तिवारी, रजत भाटिया, लॉकी फग्र्युसन, डॅन ख्रिस्तियन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, दीपक चहर, राहुल चहर, अॅडम झम्पा, अंकुश बेन्स, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अशोक दिंडा, मयांक अगरवाल, जसकरण सिंग, ईश्वर पांडे, मिलिंद टंडन.
मुंबई इंडियन्स-
रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, कर्ण शर्मा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, सौरभ तिवारी, आर. विनय कुमार, टिम साऊदी, जीतेश शर्मा, कृष्णप्पा गोथम, श्रेयस गोपाळ, कुलवंत खेजरोलिया.