इंग्लंडकडूनच शिकायला मिळाले : भुवनेश्वर कुमार
By admin | Published: July 20, 2014 12:53 AM2014-07-20T00:53:21+5:302014-07-20T00:53:21+5:30
‘दुस:या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या चुकांपासून बोध घेऊन सामन्याच्या दुस:या दिवशी मी उत्कृष्ट कामगिरी केली,’
Next
लंडन : ‘दुस:या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या चुकांपासून बोध घेऊन सामन्याच्या दुस:या दिवशी मी उत्कृष्ट कामगिरी केली,’ असे मत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीच्या दुस:या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला, ‘‘दुस:या कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकत होत़े हीच बाब निदर्शनास आली आणि आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांना कशा प्रकारची गोलंदाजी करायची, याची योजना आखली़ विशेष म्हणजे, याच कारणामुळे मला इंग्लंडच्या खेळाडूंना बाद करण्यात यश आले.’’ इंग्लंडमध्ये भुवनेश्वर याने गोलंदाजीच नव्हे, तर फलंदाजीतही कमाल केली़ याबद्दल तो म्हणाला, ‘‘संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी 1क्व्या आणि 11व्या क्रमांकाला फलंदाजीला येऊन धावा बनविणो किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली़ नेटमध्ये गोलंदाजी व फलंदाजीवरही विशेष मेहनत घेत आह़े त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकलो़ ऐतिहासिक लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी करता आली याचा आनंद आह़े लहानपणापासून लॉर्ड्सवर खेळण्याचे माङो स्वप्न होत़े ते पूर्ण झाल्याचे विशेष समाधान आह़े’’ (वृत्तसंस्था)