‘बीग बी’ची कॉमेंट्री

By admin | Published: February 16, 2015 01:48 AM2015-02-16T01:48:37+5:302015-02-16T01:48:37+5:30

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बॉलीवूडचा शहंनशहा अमिताभ बच्चन याने आपल्या कॉमेंट्रीचा तडका लावून क्रीडाप्रेमींना सुखद

'Big B' commentary | ‘बीग बी’ची कॉमेंट्री

‘बीग बी’ची कॉमेंट्री

Next

अ‍ॅडिलेड : वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बॉलीवूडचा शहंनशहा अमिताभ बच्चन याने आपल्या कॉमेंट्रीचा तडका लावून क्रीडाप्रेमींना सुखद धक्का दिला़ या महानायकाच्या जादुई आवाजाने जगभरातील क्रीडापे्रमींसह १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिलदेव याचीही वाहवा मिळविली़
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी समालोचन करण्यापूर्वी ७२ वर्षीय अमिताभचे स्टुडिओत पोहोचल्यानंतर कपिल आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी स्वागत केले़ सामन्यासाठी नाणेफेकीपूर्वी कपिल, राहुल द्रविड आणि शोएब लढतीतबद्दल चर्चा करीत होते़ द्रविडाची जागा महानायक अमिताभ बच्चन याने घेतली आणि अतिशय चाणाक्षपणे सामन्यातील प्रत्येक घटनेचे वर्णन केले़
कपिल म्हणाला की, अमिताभ बच्चन कॉमेन्ट्री करताना एखाद्या व्यावसायिक समालोचकासारखा वाटत होता़ त्याने सामन्याचे चांगले विश्लेषणही केले़ या महानायकाने येथे येण्यापूर्वी क्रिकेटमधील बऱ्याच बारकाव्यांची माहिती घेतली होती़ त्यामुळे त्यास काहीच अडचण आली नाही़


 

 

Web Title: 'Big B' commentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.