चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिकिटांसाठी मोठी मागणी
By admin | Published: October 20, 2016 06:31 AM2016-10-20T06:31:26+5:302016-10-20T06:31:26+5:30
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी जगभरातून या स्पर्धेच्या तिकिटांसाठी मोठी मागणी होत आहे.
लंडन : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी जगभरातून या स्पर्धेच्या तिकिटांसाठी मोठी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, कमीत कमी ६० देशांनी तब्बल ४ लाख १७ हजार तिकिटांसाठी निवेदन दिले आहे. स्पर्धेच्या एकूण १५ सामन्यांपैकी ११ सामन्यांसाठी निर्धारित तिकिटांपेक्षा अधिक मागणी होत आहे. तसेच, शिल्लक तिकिटे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
सर्वाधिक तिकिटांची मागणी भारत विरुद्ध पाकिस्तान या ‘हायव्होल्टेज’ सामन्यासाठी होत असून, इंग्लंड विरुद्ध आॅस्टे्रलिया आणि अंतिम सामन्याच्या तिकिटांनाही जबरदस्त मागणी आहे. त्याचप्रमाणे, इंग्लंड व बांगलादेश यांच्यात होत असलेल्या सलामीच्या लढतीसाठी आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीच्या तिकिटांसाठीही मोठी मागणी होत आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचडर््सन यांनी सांगितले, ‘‘केवळ ब्रिटनच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेसाठी उत्सुकता दाखविली आहे. १५ पैकी ११ सामन्यांच्या तिकिटांना मिळालेली सर्वाधिक मागणी या स्पर्धेची आणि क्रिकेटची लोकप्रियता स्पष्ट करीत आहे.’’ (वृत्तसंस्था)