राष्ट्रीय संघातील स्थानासाठी मोठी स्पर्धा

By admin | Published: March 22, 2017 12:00 AM2017-03-22T00:00:36+5:302017-03-22T00:00:36+5:30

‘आगामी आॅलिम्पिकसाठी सुरु असलेल्या संघबांधणी प्रक्रीयेमध्ये ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली जात आहे. सिनिअर खेळाडूंना

Big tournament for national team | राष्ट्रीय संघातील स्थानासाठी मोठी स्पर्धा

राष्ट्रीय संघातील स्थानासाठी मोठी स्पर्धा

Next

बंगळुरु : ‘आगामी आॅलिम्पिकसाठी सुरु असलेल्या संघबांधणी प्रक्रीयेमध्ये ज्यूनिअर खेळाडूंना संधी दिली जात आहे. सिनिअर खेळाडूंना त्यांना पारखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यावर संघातील आपले स्थान कायम ठेवण्याचेही आव्हान आहे. एकूणच, सध्या टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी ज्यूनिअर व सिनिअर खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा लागली आहे,’ असे वक्तव्य भारताचा हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश याने केले.
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबिरामध्ये श्रीजेशने म्हटले की, ‘संघबांधणीची ही नवी सुरुवात आहे आणि अनेक युवा खेळाडू मुख्य संभावित खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी ज्यूनिअर खेळाडूंसह सिनिअर खेळाडूंनाही कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. ज्यूनिअर खेळाडूंना कौशल्य आणि मैदानी कामगिरीमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यांना शिबीरामध्ये स्वत:ला सिध्द करावे लागेल, कारण त्यांची स्पर्धा थेट सिनिअर खेळाडूंसह आहे. त्याचवेळी, सिनिअर खेळाडूंना ज्यूनिअर खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि वेगाशी स्पर्धा करावी लागेल.’
तसेच, ‘ज्यूनिअर खेळाडूंकडे संघाचे भविष्य आहे, याची आम्हाला कल्पना आहे. २०२० टोकियो आॅलिम्पिकसाठी आम्ही तयारी करत असल्याने त्यांच्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी संघातील आपले स्थान निश्चित मानले नाही पाहिजे. संघातील स्थान त्यांनी मिळवले पाहिजे,’ असेही श्रीजेशने म्हटले.
युवा खेळाडूविषयी श्रीजेशने पुढे म्हटले की, ‘राष्ट्रीय संघाची खेळण्याची पध्दत, रणनिती आखण्याची पध्दत, तसेच ती रणनिती समजून अमलनात आणण्यासाठी युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबीर खूप महत्त्वपूर्ण ठरेल. दरम्यान, ज्यूनिअर राष्ट्रीय संघात असताना त्यांनी आमचा सरावर जवळून पाहिला आहे आणि आम्ही एकाच शिबिरामध्ये राहतो. मात्र असे असले तरी, सराव पाहणे आणि त्याचा एक भाग होणे या दोन्ही गोष्टी पुर्णपणे वेगळ्या आहेत.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Big tournament for national team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.