दिग्गजांचे अपयश आरसीबीच्या पतनास कारणीभूत
By admin | Published: May 4, 2017 12:33 AM2017-05-04T00:33:56+5:302017-05-04T00:33:56+5:30
गत उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूआयपीएल-१० मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. मागच्या वर्षी या संघाला बाद फेरीसाठी
सौरव गांगुली
गत उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूआयपीएल-१० मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. मागच्या वर्षी या संघाला बाद फेरीसाठी चारही सामने जिंकणे गरजेचे झाले होते. यंदा राहिलेले सामने जिंकून देखील प्ले आॅफ गाठणे या संघासाठी अशक्यप्राय झाले आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू स्पर्धा संपेपर्यंत धडाकेबाज कामगिरीसह चाहत्यांचे मनोरंजन करीत रहावा, अशी अपेक्षा असताना ही वाईट बातमी आली.
ज्या संघात कोहलीसह एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यासारखे दिग्गज असतील त्या संघाकडून स्फोटक फलंदाजीची अपेक्षा करणे योग्यच आहे. माझ्यामते सुरुवातीच्या काही सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्सचे न खेळणे संघासाठी नुकसानदायी ठरले. त्यातून हा संघ सावरू शकला नाही. गेलच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव जाणवला. या संघाची गोलंदाजी ढेपाळलेलीच दिसली. एकीकडे विराट, गेल, एबी यांनी अपेक्षेवर पाणी फेरले तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो आहे. तो मनसोक्त फटकेबाजी करीत सर्व
लक्ष वेधून घेतो. आयपीएल-१० समारोपाकडे जात असताना मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या संघांनी अंतिम चार संघांसाठी दावेदारी पुढे केलेली दिसते. चौथ्या स्थानासाठी मात्र पुणे, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात जबर चुरस दिसते. (गेमप्लान)