क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वात भारी सेल्फी

By admin | Published: April 1, 2016 04:02 PM2016-04-01T16:02:51+5:302016-04-01T16:05:51+5:30

शेन वॉर्नने शेअर केलेल्या या सेल्फीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी तडाखेबंद फलंदाज ब्रायन लारा आहेत

The biggest self-defense ever made in the cricket world | क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वात भारी सेल्फी

क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वात भारी सेल्फी

Next
ऑनलाइन लोकमत - 
सिडनी, दि. १ - सेल्फी हा आता ट्रेंडच झाला आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण सेल्फी काढून सोशल मिडियावर शेअर करत असतो. पण सगळ्यात जास्त आवडलेला सेल्फी कोणता असा प्रश्न एखाद्या क्रिकेटप्रेमीला विचारला तर त्याचं उत्तर तो लगेच देऊ शकणार नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नने शेअर केलेला हा सेल्फी पाहून प्रत्येक क्रिकेटरसिकाला आपलं उत्तर मिळेल. 
 
शेन वॉर्नने शेअर केलेल्या या सेल्फीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी तडाखेबंद फलंदाज ब्रायन लारा आहेत. क्रिकेट जगतातील हे तीन दिग्गज एकाच सेल्फीत आल्याने हा सेल्फी आतापर्यंतचा भारी सेल्फी असं म्हणायला काही हरकत नाही. तिन्ही खेळाडूंनी क्रिकेटचं एक दशक गाजवलं आहे. या दिग्गजांनी क्रिकेटर्सची एक पिढीच घडवली आहे. शेन वॉर्नसमोर सचिन तेंडूलकरची बॅटींग पाहणं याला काही तोडच नाही. स्वत: शेन वॉर्न सचिनसमोर बॉलिंग करायला घाबरायचा.
 
शेन वॉर्नने ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. '20 वर्ष या दोघांविरोधात खेळणं एक आनंद होता. पण त्यांच्यासमोर बॉलिंग करण्यात नाही. 20 वर्ष आम्ही तिघांनी  क्रिकेट खेळून क्रिकेटमधून आनंद दिला असं लोक विचार करतात हे उत्तम' असं शेन वॉर्नने म्हंटलं आहे. 
 

Web Title: The biggest self-defense ever made in the cricket world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.