आयपीएलमधील सर्वात मोठा विजय

By admin | Published: May 7, 2017 05:34 AM2017-05-07T05:34:04+5:302017-05-07T05:34:04+5:30

मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४६ धावांच्या फरकाने विजय मिळवला. आयपीएलच्या दहाही सत्रातील हा सर्वात मोठा विजय

The biggest win in the IPL | आयपीएलमधील सर्वात मोठा विजय

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय

Next

आकाश नेवे/आॅनलाइन लोकमत
मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४६ धावांच्या फरकाने विजय मिळवला. आयपीएलच्या दहाही सत्रातील हा सर्वात मोठा विजय आहे. या आधी २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात लायन्सवर १४४ धावांच्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने प्लेआॅफचे तिकीट पक्के केले. प्लेआॅफमध्ये प्रवेश करणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. या विजयाचा
हीरो ठरला तो लेंडल सिमन्स आणि हरभजन सिंह. दोन्ही डावात मुंबईची सुरुवात दणक्यात झाली. जोश बटलरऐवजी स्थान मिळालेला लेंडल सिमन्स हा मुंबईसाठी फायदेशीर ठरला. त्याने पार्थिव पटेलच्या बरोबरीने दणकेबाज सुरुवात केली, त्याने ६६ धावा पटकावल्या. किरॉन पोलार्डनेही दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढली, त्याने ३५ चेंडूतच ६३ धावा पटकावल्या. अखेरच्या षटकांत हार्ड हिटर हार्दिक पांड्याने दिल्लीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. दुखापतीनंतर जहीरने
केलेले पुनरागमन संघासाठी फायदेशीर ठरले नाही. या पराभवाने संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. दिल्लीच्या फलंदाजीत अनुभवाची असलेली कमतरता आज पुन्हा एकदा संघ व्यवस्थापनाला जाणवली असेल. गेल्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करणारा संजू सॅमसनला डावाच्या पहिल्याच चेंडूत मॅक्लेघनने बाद केले. मुंबई इंडियन्स हा गुजरात लायन्सचा संघ नाही, ते आयपीएलमध्ये अव्वल स्थानावर का आहेत हे त्यांच्या गोलंदाजीने सर्वांना दाखवून दिले. मॅक्लेघनने संजूला बाद करत
दिल्लीला धक्का दिला; त्यातून दिल्लीचा संघ सावरलाच नाही. करुण नायर वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. गुजरात विरोधात ९७ धावांची खेळी करणारा ऋषभ पंत या सामन्यात शून्यावरच बाद झाला. अय्यर, मार्लोन सॅम्युुअल्स, कोरी अँडरसन हे फक्त खेळपट्टीवर हजेरी लावून गेले. जहीरच्या पुनरागमनाने ख्रिस मॉरीसला बाहेर बसावे लागले, त्याची उणीव
दिल्लीला या सामन्यात नक्की जाणवली असेल दिल्लीच्या पॅट कमिन्स याने या सामन्यात या सत्रातील सर्वात महागडा
गोलंदाज ठरण्याच्या रबाडाच्या विक्रमाची बरोबरी साधली. कमिन्सने या सामन्यात ४ षटकांत ५९ धावा दिल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी मात्र दिल्लीची दैना केली. हरभजन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा ऋषभ
पंतचा बळी घेतला. मिशेल मॅक्लेघनने मुंबईसाठी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले आहे. ११ सामन्यांत १६ बळींसह आॅरेंज कॅपच्या शर्य$तीत तो चौथ्या स्थानावर आहे.

Web Title: The biggest win in the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.