बिलालच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील

By admin | Published: November 1, 2015 03:04 AM2015-11-01T03:04:05+5:302015-11-01T03:04:05+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पाकिस्तानी आॅफस्पिनर बिलाल असीफ याच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दाखवला आहे.

Bilal's bowling style green lantern | बिलालच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील

बिलालच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील

Next

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) पाकिस्तानी आॅफस्पिनर बिलाल असीफ याच्या गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दाखवला आहे.
याविषयी आयसीसीने म्हटले, की चेन्नईत झालेल्या गोलंदाजी परीक्षणादरम्यान बिलाल याच्या हाताच्या कोपऱ्याचा घुमाव हा आयसीसीद्वारे निर्धारित १५ डिग्रीच्या निश्चित केलेल्या निकषाअंतर्गत आढळला.३ आॅक्टोबर रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान बिलाल याच्या गोलंदाजी शैलीचा अहवाल
देण्यात आला होता. त्यानंतर त्याला १९ आॅक्टोबर रोजी चेन्नईस्थित आयसीसीच्या अधिकृत केंद्रात परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते.
३० वर्षीय बिलालने नुकतेच झिम्बाब्वे दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या दुसऱ्याच सामन्यात २५ धावांत ५ गडी बाद केले होते. या सामन्यादरम्यानच पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी त्याची शैली संशयास्पद असल्याचे घोषित केले. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक इन्तिखाब आलम यांनी या
निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाला, की बिलाल गोलंदाजी शैलीच्या परीक्षणात निश्चित
यशस्वी होईल, याचा आम्हाला विश्वास होता. ही बाब संघासाठी खूप चांगली आहे. आयसीसीने गेल्यावर्षी जून महिन्यातच गोलंदाजी शैलीवर तीक्ष्ण नजर ठेवली आहे.
यादरम्यान एकूण १२ गोलंदाजांची शैली संशयित ठरवली होती. त्यात पाकिस्तानचा सईद अजमल, मोहम्मद हाफीज, बांगलादेशचा सोहाग गाजी, न्यूझीलंडचा केन विलियम्सन, श्रीलंकेचा सचित्रा सेनानायके आणि थरिंडू कौशल व झिम्बाब्वेचा प्रॉस्पर उत्सेया आणि माल्कम वॉलर यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Bilal's bowling style green lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.