मुंबई स्टार्सची अंतिम फेरीत धडक बिलियर्ड्स लीग : शांदिलियाचा निर्णायक खेळ

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:47+5:302015-08-26T23:32:47+5:30

मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई स्टार्सने आपला धडाका कायम राखताना क्वालिफायर -१ सामन्यात एसपीजी बिलियर्ड्स संघाला ३-१ असे पराभूत करुन बिलियर्ड्स प्रिमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Billiards League defeats Mumbai Stars final: Shandilya's crucial game | मुंबई स्टार्सची अंतिम फेरीत धडक बिलियर्ड्स लीग : शांदिलियाचा निर्णायक खेळ

मुंबई स्टार्सची अंतिम फेरीत धडक बिलियर्ड्स लीग : शांदिलियाचा निर्णायक खेळ

Next
ंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई स्टार्सने आपला धडाका कायम राखताना क्वालिफायर -१ सामन्यात एसपीजी बिलियर्ड्स संघाला ३-१ असे पराभूत करुन बिलियर्ड्स प्रिमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
बिलियर्ड्स ॲंड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बॉम्बे जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत निखिल घाडगे - हसन बदामी या अनुभवी जोडीने शेखर सुर्वे - शिवम अरोरा यांचा १७५-६३ असा पाडाव करुन मुंबई स्टार्स संघाला आघाडीवर नेले. यानंतरच्या एकेरी लढतीत अशोक शांदिलियाला नवोदित इशप्रीत सिंग चढ्ढाच्या अचूक खेळापुढे पराभव पत्करावा लागल्याने सामना बरोबरीत आला.
मात्र, मुंबई स्टार्सच्या खेळाडूंनी सलग दोन फ्रेमममध्ये बाजी मारताना अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. विशाल मदनने देंवेंद्र जोशीला नमवले. तर अनुभवी अशोकने झालेल्या पराभवाचा वचपा काढताना इशप्रीतचा धुव्वा उडवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. (क्रीडा प्रतिनिधी)
......................................

फोटो : अशोक शांदिलिया स्ट्रोक मारताना.

Web Title: Billiards League defeats Mumbai Stars final: Shandilya's crucial game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.