बिन्नीचे शतक हुकले; इंडिया रेड सर्व बाद ३५६
By admin | Published: September 13, 2016 03:37 AM2016-09-13T03:37:12+5:302016-09-13T03:37:12+5:30
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने दुलीप करंडक दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेत इंडिया रेड संघाकडून ९८ धावांची दमदार खेळी केली
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने दुलीप करंडक दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेत इंडिया रेड संघाकडून ९८ धावांची दमदार खेळी केली. त्याने १५९ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकार ठोकले. इंडिया ब्लू संघाच्या ६ बाद ६९३ (घोषित) धावांच्या आव्हानाला उत्तर देताना इंडिया रेड संघाच्या पहिल्या डावात सर्व बाद ३५६ धावा झाल्या. बिन्नीनंतर अमित मिश्राने ६५ व कुलदीप यादवने ५९ धावा केल्या. इंडिया ब्लू संघाकडून रवींद्र जाडेजाने ९५ धावांत ५ बळी तर पंकज सिंग आणि केव्ही शर्माने प्रत्येकी २ बळी घेतले.
इंडिया ब्लू संघाच्या दुसऱ्या डावात २ षटकांत बिनबाद १ धाव झाली आहे. एम. अगरवाल ० व गौतम गंभीर १ धाव काढून खेळत होते. (वृत्तसंस्था)