ब्लाटर, प्लाटिनी यांची सुनावणी फिफा न्यायालयात

By admin | Published: December 18, 2015 03:16 AM2015-12-18T03:16:10+5:302015-12-18T03:16:10+5:30

विश्व फुटबॉलचे निलंबित प्रमुख सॅप ब्लाटर आणि उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनीविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सुनावणी फिफा न्यायालय करणार आहे.

Blatter, Platini to hear FIFA court | ब्लाटर, प्लाटिनी यांची सुनावणी फिफा न्यायालयात

ब्लाटर, प्लाटिनी यांची सुनावणी फिफा न्यायालयात

Next

झुरिच : विश्व फुटबॉलचे निलंबित प्रमुख सॅप ब्लाटर आणि उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनीविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सुनावणी फिफा न्यायालय करणार आहे.
ब्लाटर हे फिफा न्यायाधीशांपुढे स्वत:ची बाजू स्वत: मांडतील. ब्लाटर हे स्वित्झर्लंडच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले. २०११ मध्ये प्लाटिनी यांना २० लाख स्विस फ्रँक दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी निर्णय सोमवारपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ब्लाटर हे क्रीडा लवादाकडे दाद मागू शकतात.
यूएफा प्रमुख प्लाटिनी यांनी मात्र सुनावणीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. फिफा तपासकर्त्यांनी माझ्यावर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली आहे. सुनावणीआधीच निकाल तयार असेल तर सुनावणी कशासाठी, असा सवाल प्लाटिनी यांनी उपस्थित केला.
अल सॅल्व्हाडोरचा
फुटबॉलप्रमुख अटकेत
अल सॅल्व्हाडोरच्या राष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा माजी प्रमुख रेनाल्डो वासकेज याला फिफामध्ये लाखो डॉलरच्या भ्रष्टाचारप्रकरणी अमेरिकेच्या तपासकर्त्यांनी अटक केली आहे. जून २००९ ते जुलै २०१० दरम्यान देशाच्या फुटबॉल संघटनेचे प्रमुख राहिलेले वासकेज हे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या १६ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. संशयास्पद ड्रग तस्करांना ठेवल्या जाणाऱ्या कोठडीत वासकेज यांना डांबण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

एक अब्जावर लोकांनी लुटला फायनलचा आनंद
२०१४ च्या फुटबॉल विश्वचषकाचा जर्मनी-अर्जेंटिना हा फायनलचा सामना टीव्हीवर एक अब्जापेक्षा अधिक लोकांनी पाहिला. रियोच्या मार्काना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यातील अतिरिक्त वेळेत जर्मनीने १-० ने सरशी साधली. या सामन्याचा आनंद एक अब्ज, एक कोटी, तीन लाख लोकांनी लुटल्याचे फिफाच्या वेबसाईटने म्हटले आहे. टीव्ही रेटिंगमध्ये सात टक्के वाढ झाली आहे.

ब्लाटर नोबेल पुरस्कारासाठी पात्र : पुतीन
मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर यांना नोबेल शांती पुरस्कार द्यायला हवा, असे सांगितले. ब्लाटर यांच्यावर विश्व फुटबॉल संघटनेत कथित भ्रष्टाचाराचा आरोप आहे. पुतीन म्हणाले, ‘‘त्यांना नोबेल शांती पुरस्कार द्यायला हवा. वैश्विक मानवीय क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.’’ त्याचबरोबर त्यांनी ब्लाटर यांच्याविरुद्ध सध्या सुरू असलेल्या चौकशीपाठीमागे पश्चिमी देशांचा कट आहे, असे सांगितले.
ब्लाटर यांच्यावर स्वीत्झर्लंडमध्ये फिफा उपाध्यक्ष मायकल प्लाटिनी यांना २0 लाख स्वीस फ्रँ क देण्याच्या आरोपाविषयी चौकशी सुरू आहे. ब्लाटर आणि प्लाटिनी या दोघांवर फुटबॉलसंबंधी गतिविधींसाठी ९0 दिवस बंदी लादण्यात आली आहे. फिफाच्या नव्या अध्यक्षांची निवडणूक पुढील वर्षी २६ फेब्रुवारीला होईल.

Web Title: Blatter, Platini to hear FIFA court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.