आनंदित रेड्डीने मारली बाजी

By Admin | Published: October 10, 2016 04:19 AM2016-10-10T04:19:22+5:302016-10-10T04:19:22+5:30

हैदराबादचा उगवता तारा आनंदित रेड्ढीने अनपेक्षित कामगिरी करीत युरो जेके १६ रेसिंगमध्ये बाजी मारली. तिसऱ्या फेरीअखेर त्याचे ७६ गुण झाले असून, तो आता

Blissful | आनंदित रेड्डीने मारली बाजी

आनंदित रेड्डीने मारली बाजी

googlenewsNext

विश्वास चरणकर / कोईम्बतूर
हैदराबादचा उगवता तारा आनंदित रेड्ढीने अनपेक्षित कामगिरी करीत युरो जेके १६ रेसिंगमध्ये बाजी मारली. तिसऱ्या फेरीअखेर त्याचे ७६ गुण झाले असून, तो आता अनंत षण्मुगमसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. एलजीबी फॉर्म्युला ४ शर्यतीत चेन्नईच्या विष्णू प्रसादने दोन्ही शर्यती जिंकत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. या वेळी आंतरराष्ट्रीय स्टंटमास्टर टेरी ग्रँट यांनी केलेल्या चारचाकी गाड्यांच्या ‘स्टंट शो’ने प्रेक्षकांची मने जिंकली.
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील केरी मोटर स्पीडवे ट्रॅकवर रविवारी जे के राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप २0१६चा तिसरा राउंड पार पडला. रेड्डीने युरो जेके १६ गटात ३८ गुणांची कमाई करताना संयुक्त अव्वल स्थान पटकावले. बंगळुरूच्या अनंतला या शर्यतीतून २८ गुण पदरी पडले. शनिवारच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करणारा मुंबईचा नयन चॅटर्जी एकूण ७३ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत कोल्हापूरचा ध्रुव मोहिते चौथ्या स्थानावर आहे.
एलजीबी फॉर्म्युला ४ शर्यतीत चेन्नईच्या विष्णू प्रसादने दोन्ही शर्यतींत प्रथम स्थान मिळवले असले तरी त्याला रविवारी त्याच्याच मेको स्पोर्ट्सच्या राघुल रंगास्वामीने कडवी झुंज दिली. 0.0२३ सेकंदाने तो विष्णूपेक्षा मागे पडला. राघुल एकूण ५१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावरील विष्णूचे ६६ गुण असून, सरन विक्रम तिसऱ्या तर रोहित खन्ना चौथ्या स्थानावर आहे.
जेके टुरींग कार गटात बेंगलोरच्या आशिष रंगास्वामीने आपले सिंहासन अबाधित राखले आहे. त्याचे एकूण १२0 गुण झाले आहेत.

Web Title: Blissful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.