लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी BCCIची समिती, सौरभ गांगुलीचा समावेश
By admin | Published: June 27, 2017 04:22 PM2017-06-27T16:22:54+5:302017-06-27T16:33:17+5:30
सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयने एक समिती गठीत केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयने एक समिती गठीत केली आहे. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष सौरभ गांगुलीचाही समावेश आहे. समितीची पहिली बैठक 30 जून रोजी पार पडणार आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी समितीचे संयोजक असणार आहेत.
लोढा समितीच्या शिफारशी बीसीसीआयच्या प्रशासनात सहजतेनं कशा लागू करता येतील याचा अभ्यास ही समिती करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. समितीला लवकरात लवकर बैठक घेऊन 10 जुलैपर्यंत आपला लेखी अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर बोर्डाची जनरल बॉडी एक विशेष बैठख घेऊन सविस्तर चर्चा करत प्रस्तावांना मान्यता देईल.
Committee formed for implementing principle order of SC to be chaired by Rajiv Shukla, Amitabh Chaudhary is the convenor #BCCI
— ANI (@ANI_news) June 27, 2017
या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. राजीव शुक्ला आणि सौरव गांगुली यांच्यासोबत बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी टी. सी. मॅथ्यू, नबा भट्टाचारजी, जय शाह यांचाही समावेश आहे.
Members of the committee include Saurav Ganguly, Anirudh Chaudhary among others. First meeting on June 30. #BCCI
— ANI (@ANI_news) June 27, 2017
बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सागितलं होतं की, ""गतवर्षी 18 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी बीसीसीआय एक समिती गठीत करणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाला लवकरात लवकर आणि प्रभावीपणे कसं लागू करता येईल यासाठी समिती सल्ला देईल".
लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्यानं सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला चांगलंच फटकारलं होतं. बीसीसीआयने देखील शिफारशी जाचक असल्याचं म्हणत लागू करण्यास टाळाटाळ केली होती. अद्यापही बीसीसीआय पळवाटा शोधत असून आता काय करता येईल यासाठी ही समिती गठीत केली आहे.