पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या आभार पत्रात बॉडी बिल्डरची छेडछाड, गुन्ह्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:28 PM2019-08-02T15:28:31+5:302019-08-02T15:32:50+5:30
अमित स्वामीने 2018मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मुंबई: हरियाणाच्या रेवडी गावातील राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी बॅाडी बिल्डर अमित स्वामीने एका मित्राच्या सहाय्याने पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या आभार पत्रामध्ये छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानं या पत्रात आपल्या प्रशंसाबद्दल ओळी लिहिल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अमित स्वामीने 2018मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून अमितला आभार मानणारे पत्र पाठवण्यात आले. त्यात फक्त आभार व्यक्त करणाऱ्या ओळी लिहिल्या होत्या, परंतु अमितने त्यात छेडछाड करुन आपल्या प्रशंसा करणाऱ्या ओळी लिहील्या.
काही महिन्यानंतर हा सर्व प्रकार पंतप्रधान कार्यालयातील सहाय्यक संचालक पीके इस्सर यांच्या लक्षात येताच त्यांनी सीबीआयकडे लिखीत तक्रार नोंदवली. तसेच या तक्रारची कॅापी नवी दिल्ली मधील केंद्रीय सचिवालय, डीपीजी हरियाणा सेक्टर- 6 पंचकूलाला देखील पाठविले. तसेच सीबीआयने अमित स्वामी व त्याच्या मित्रावर गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली आहे.
आरोपी अमित स्वामी हा बॅाडी बिल्डिंग व क्रीडा प्रमोटरसोबतच दक्षिण आशिया कॅामनवेल्थ बॅाडी बिल्डिंग व क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आहे.