बॉलिवूड ही कुणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही; 'दंगल' गर्ल बबिता फोगाट उतरली आखाड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 06:11 PM2020-06-15T18:11:25+5:302020-06-15T18:12:13+5:30
'हा करण जोहर आहे तरी कोण?
सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसला. काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री मारणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले. पण, वयाच्या 34व्या वर्षी त्यानं जग सोडल्याच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का दिला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना अभिनेत्री कंगना राणौत हिने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर करण इंडस्ट्रीतील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतने मोठ मोठे सिनेमे केलेत़ पण त्याला एकही मोठा अवार्ड मिळाला नाही. इंडस्ट्रीत मुव्ही माफियांची मुळं खोलवर रूजली आहेत. सुशांत त्याचाच बळी ठरला, असे कंगनाने म्हटले आहे. कंगनानं शेअर केलेल्या व्हिडीओनंतर 'दंगल' गर्ल आणि भाजपा नेता बबिता फोगाटनंही बॉलिवूडवर टीका केली.
सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती
'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक
कंगनाचा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं की, कंगना मला तुझं म्हणणं पटतंय. लहान शहरातून येणाऱ्या लोकांबरोबर तिथे भेदभाव केला जातो. तसं व्हायला नहो. फिल्म इंडस्ट्री कोणाच्या बापजाद्याची मालमत्ता नाही. भाऊ-भाचा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा आजार आहे. या आजाराला मी पण खूप जवळून पाहिले आहे.''
कंगना राणावत बहन की बात मुझे काफी हद तक सही लगती है।जो लोग छोटे शहरों से आते हैं उन लोगों के साथ वहां इस तरह का भेदभाव होता है जो नहीं होना चाहिए।फिल्म इंडस्ट्री किसी की बपौती नहीं है।भाई भतीजावाद बॉलीवुड की सबसे बड़ी बीमारी है मैंने खुद इसको काफी नजदीक से देखा है। https://t.co/bvToXzDwTV
— Babita Phogat (@BabitaPhogat) June 15, 2020
बबिता पुढे लिहिते की,''मोजक्या कुटुंबीयांच्या हातातून फिल्म इंडस्ट्रीला सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. देशवासीयांनी एकत्र येऊन हा दुजाभाव करणाऱ्या लोकांच्या चित्रपटावर बहिष्कार घालायला हवा. अन्यथा अजून कितीतरी लहान शहरातून आलेल्या लोकांना जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागेल.''
अब समय आ गया है फिल्म इंडस्ट्री को चुनिंदा परिवारों की गिरफ्त से बाहर करवाया जाए। सभी देशवासियों को एकजुट होकर भाई भतीजावाद करने वालों की फिल्मों को देखना बंद किया जाए नहीं फिर पता नहीं कितने छोटे शहरों से गए लोगों को अपनी जान देकर इसकी कीमत चुकानी पड़ेगी।#nepotisminbollywood
— Babita Phogat (@BabitaPhogat) June 15, 2020
''हा करण जोहर आहे तरी कोण? फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यानं काय घाण पसरवली आहे. ही इंडस्ट्री त्याच्या बापजाद्याची मालमत्ता आहे का? इंडस्ट्रीतील लोकं का त्याला उत्तर देत नाहीत? फक्त एक वाघीण त्याला उत्तर देत आहे. या गँगच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार घाला,''असे आवाहनही बबितानं केलं.
करण जौहर कौन है??क्या गंदगी फैला रखी है इसने फिल्म इंडस्ट्री में।इसकी बपौती है क्या फिल्म इंडस्ट्री इसको मुंहतोड़ जवाब क्यों नहीं देते?एक हमारी शेरनी बहन कंगना राणावत है जो इसको जवाब देती है।इस गैंग की सभी फिल्मों का बायकट करो। #bycottkarnjohrgangmovie
— Babita Phogat (@BabitaPhogat) June 15, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर
OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!
WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली
झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच!
विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा
फलंदाजाचा 'तो' फटका पाहून गोलंदाजही झाला अवाक्; 23 हजारवेळा पाहिला गेला Video!
बाबो! दिग्गज महिला खेळाडूची बाथरूममध्ये प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म!