बोल्टचा 'हॅट्ट्रिक'चा निर्धार!

By admin | Published: July 29, 2016 07:04 PM2016-07-29T19:04:41+5:302016-07-29T19:04:41+5:30

वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट हा आॅलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम स्वत:च्या नावे करण्याच्या निर्धाराने रिओत उतरणार आहे

Bolt's hat-trick is determined! | बोल्टचा 'हॅट्ट्रिक'चा निर्धार!

बोल्टचा 'हॅट्ट्रिक'चा निर्धार!

Next

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २९ : वेगवान धावपटू जमैकाचा उसेन बोल्ट हा आॅलिम्पिकमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याचा विक्रम स्वत:च्या नावे करण्याच्या निर्धाराने रिओत उतरणार आहे. अ‍ॅथ्लेटिक्सला लागलेला डोपिंगचा डंख यानिमित्ताने पुसूनकाढण्याची संधी असल्याचे बोल्टला वाटते.

गतवर्षी सॅबेस्टीयन को यांनी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी डोपिंगबाबत झिरो टॉलरन्सधोरण अवलंबले आहे. रशियात सरकार पुरस्कृत डोपिंगचा सनसनाटी खुलासा झाला. यावर कारवाई म्हणून
आयएएएफने रशियाच्या अ‍ॅथ्लेटिक्स पथकावर रिओ आॅलिम्पिकमध्ये बंदी घातली. क्रीडा लवादाने देखील ही बंदी कायम राहील, असा निर्वाळा दिला. याचा अर्थ तीन सुवर्ण विजेता बांबूउडीतील रशियाची खेळाडू एलिना इसिनबायेव्हा, ११० मीटर अडथळा शर्यतीची विजेता सर्जेइ शुर्वेकोव्ह आणि उंच उडीतील विश्वविजेती मारिया कुचिना हे रिओमध्ये दिसणार नाहीत. या स्थितीत
सर्वांच्या नजरा असतील त्या बोल्टवर!

बोल्ट म्हणाला,रिओत इतिहास घडणार. जगाने स्मरणात ठेवावी अशी कामगिरी करणार आहे. हे माझे अखेरचे आॅलिम्पिक असल्याने मोलाचे असेल. मी पूर्णपणे फिट असून थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आधीच्या तुलनेत आणखी चांगले वाटत
आहे. येथे धावणे सुरू केले आहे. जेतेपद कायम राखण्यास मी उत्सुक आहे.

Web Title: Bolt's hat-trick is determined!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.