बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे विजेतेपद

By admin | Published: December 14, 2015 02:44 AM2015-12-14T02:44:10+5:302015-12-14T02:44:10+5:30

बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (बीईजी, खडकी) संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात पुण्याच्या सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाचे कडवे आव्हान ६२ - ५८ असे परतावून १३व्या नागपाडा बास्केटबॉल

Bombay Engineering Group's championship | बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे विजेतेपद

बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे विजेतेपद

Next

मुंबई : बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (बीईजी, खडकी) संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात पुण्याच्या सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाचे कडवे आव्हान ६२ - ५८ असे परतावून १३व्या नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) निमंत्रित स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात मुंबई स्टार्सने बाजी मारली.
बचुखान महापालिका मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष अंतिम सामन्यात मध्यांतराला बीईजी संघाने २६-२१ असे नियंत्रण राखले. यानंतर सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाने पुनरागमनाचे प्रयत्न करताना बीईजीला कडवी टक्कर दिली. मात्र नालागुरू याने सर्वाधिक १७ गुणांची कमाई करताना बीईजीच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची कामगिरी केली.
महिलांच्या अंतिम सामन्यात श्रेया (१६), चरमैने (१०) आणि रचेल (१०) यांनी केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई स्टार्सने सहज विजय मिळवताना बलाढ्य मध्य रेल्वेला ४६-३० असा धक्का दिला. मध्यांतराला मध्य रेल्वेने १४-१२ अशी आघाडी घेतली, मात्र ही आघाडी टिकवण्यात त्यांना अपयश आले.
दुसऱ्या बाजूला मस्तान वायएमसीएने यजमान एनबीएचा ५१-२० असा फडशा पाडून २१ वर्षांखालील मुलांचे विजेतेपद पटकावले. यानंतर मस्तानने एनबीएला अवघ्या एका गुणाने ५९-५८ असे नमवून ज्युनिअर गटाचे विजेतेपद उंचावले. तर युवा गटातही मस्तान संघाने पुन्हा एकदा यजमानांना धक्का देत ६८-३९ अशा गुणांनी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Bombay Engineering Group's championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.