मुंबई विद्यापीठाचा दबदबा

By Admin | Published: March 10, 2017 11:42 PM2017-03-10T23:42:49+5:302017-03-10T23:42:49+5:30

अखिल महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू चषक टी-२०’ स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने पुण्याच्या सावित्रीबाई फुले

Bombay University's influence | मुंबई विद्यापीठाचा दबदबा

मुंबई विद्यापीठाचा दबदबा

googlenewsNext

कोल्हापूर : अखिल महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी ‘कुलगुरू चषक टी-२०’ स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाचा पाच गडी राखून पराभव करीत स्पर्धेचे सलग चौथ्यांदा अजिंक्यपद पटकाविले.
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे) संघाने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. यात सुनील माटेने ४३, मनीष गायकवाडने ३६, नितीन प्रसादनने ३३ धावा केल्या. गोलंदाजी करताना मुंबई संघाकडून संजय पवारने २, मनोहर माने व चंद्रकांत दासगांवकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात, मुंबई संघाने १८.१ षटकांत ५ बाद १३९ धावा करीत सामना व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यात मनोहर माने यांनी अष्टपैलू खेळी करीत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही नाबाद २८ धावा केल्या; तर संजय भालेराव याने ३६, चंद्रकांत दासगांवकरने २३, संजय पवारने २० धावा केल्या. गोलंदाजी करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडून सुनील माटे व विनोद नरके यांनी प्रत्येकी २ बळी, तर संतोष सुगावेने १ बळी घेतला. ‘सामनावीर’ म्हणून मुंबईच्या संजय भालेरावला गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)

वैयक्तिक विजेते :
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज - विश्वनाथ वरुटे (शिवाजी विद्यापीठ)
उत्कृष्ट फलंदाज- नितीन प्रसाद (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे)
उत्कृष्ट यष्टिरक्षक - सुशील सावंत (मुंबई विद्यापीठ)
मालिकावीर - मनीष गायकवाड (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे)

Web Title: Bombay University's influence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.