‘बूस्टर जेट्स’ला हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार

By Admin | Published: March 5, 2017 01:05 AM2017-03-05T01:05:18+5:302017-03-05T01:05:18+5:30

वातावरणाची सवय नसल्याने उन्हाचा त्रास होत आहे. अंतिम दिवशी २० लॅपचे आव्हान असल्याने साहजिकच उन्हामुळे आम्हां सर्वांच्या कामगिरीवर फरक पडेल.

Booster Jets will get 'Satisfaction' of Haettrick | ‘बूस्टर जेट्स’ला हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार

‘बूस्टर जेट्स’ला हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार

googlenewsNext

मुंबई : वातावरणाची सवय नसल्याने उन्हाचा त्रास होत आहे. अंतिम दिवशी २० लॅपचे आव्हान असल्याने साहजिकच उन्हामुळे आम्हां सर्वांच्या कामगिरीवर फरक पडेल. उलट सी.एस.संतोषला या वातावरणाची सवय आहे. संतोषच्या कामगिरीचा संघाला फायदा होईल, असे मत बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी कोलमन जोडीने व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही दिवशी अग्रस्थान मिळवणाऱ्या बूस्टर जेट्स संघाला अंतिम दिवशी हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष राहणार आहे.
शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही अपेक्षेप्रमाणे बूस्टर कोलमन जोडीने अव्वल स्थान कायम राखले आहे. पी-वन पॉवरबोट रेसिंग स्पर्धेत जेट्स संघाने शुक्रवारच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. नेव्हिगेटर (दिशादर्शक) डेसीच्या योग्य मार्गदर्शनामुळे पायलट (चालक) सॅम कोलमन जोडीचे दुसऱ्या दिवशीही वर्चस्व दिसून आले. स्पर्धेत १५ लॅप ३७:४२:३८ मिनिटांत पूर्ण केले. (क्रीडा प्रतिनिधी)

‘काँटे-की-टक्कर’ अन् बोट उलटली
१स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसरे स्थान मिळवण्यासाठी मर्लिन्स संघाचे (बोट क्रमांक-९९) जेम्स नॉर्विल व ख्रिस्तीयन पार्सन्स-यंग आणि मावेरिक्स संघाचे जॉन डोन्नेली व केविन बुरडॉक (बोट क्रमांक-९५) यांच्यात ‘काँटे-कि-टक्कर’ झाली. अन्य पॉवरबोटमुळे तयार झालेल्या लाटा, लाटांमुळे मुसंडी मारणारी वेगवान बोट यावर नियंत्रण मिळवत दुसरे स्थान मिळवण्यासाठी सुरु असलेल्या स्पर्धेच्या थराराचा मुंबईकरांनी यथेच्छ आनंद लुटला.
२मात्र रेस ट्रॅकवर ७ व्या लॅपनंतर डॉल्फिन संघाने पॉवर बोटवर नियंत्रण मिळवत वेगवान आगेकूच केली. १४ व्या लॅपमध्ये शेवटच्या उजव्या वळणावर वळण घेत असताना नियंत्रण सुटल्यामुळे मावेरिक्स संघाची बोट उलटली. मात्र तात्काळ जीवरक्षक आल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. परिणामी स्पर्धा पूर्ण न करताच त्यांना परतावे लागले.

- तर अवघ्या २:२६:०४ मिनिटांत सर्वात जलद लॅप पूर्ण करण्याचा देखीन मान जेट्सच्या कोलमन जोडीने मिळवला. स्पर्धेत ५९ गुणांची कमाई करत बूस्टर जेट्सने अव्वल स्थान कायम राखले आहे.
- देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सी.एस.संतोष आणि गौरव गिल स्पर्धेत आपली छाप पाडण्यास अपयशी ठरत आहे. परिणामी शानदार कामगिरीने स्पर्धेचा शेवट ‘गोड’ करण्याचा निर्धार या भारतीय खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
- बूस्टर जेट्स संघाच्या संतोष व मार्टिन्स रॉबिनसन् जोडीने सर्वोत्तम २:३२:३२ मिनिटांची वेळ नोंदवत नवव्या स्थानावर स्पर्धा पूर्ण केली. शार्क संघाच्या गौरव गिल व जॉर्ज इवेने सर्वोत्तम २:३०:२१ मिनिटांची वेळ नोंदवत स्पर्धा सहाव्या स्थानी पूर्ण केली. रेसिंग संघाच्या फ्रँक सिल्वा व टोनी लनॉटो जोडीच्या (बोट क्रमांक-२५) बोटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही जोडी स्पर्धेत सहभागी झाली नाही.

दुसऱ्या दिवस अखेर
संघाची गुणतालिका
संघाचे नाव बोट एकत्रित
क्रमांकगुण
बूस्टर जेट्स १००-१५०५९
डॉल्फिन्स११-२१५७
मार्लिन्स ९९-९९९५२
शार्कस्१०-२०४१
मावेरिक्स९५-९८३३७
रेसिंग१४-२५१९

Web Title: Booster Jets will get 'Satisfaction' of Haettrick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.