बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार

By admin | Published: August 31, 2016 04:48 AM2016-08-31T04:48:39+5:302016-08-31T04:48:39+5:30

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटाच्या प्ले आॅफ लढतीत बलाढ्य स्पेनविरुद्ध भारताने आपला संघ कायम राखला आहे.

Bopanna and Paes will play together again | बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार

बोपन्ना-पेस पुन्हा एकत्र खेळणार

Next

नवी दिल्ली : डेव्हिस कप टेनिस स्पर्धेच्या विश्व गटाच्या प्ले आॅफ लढतीत बलाढ्य स्पेनविरुद्ध भारताने आपला संघ कायम राखला आहे. आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या लढतीसाठी आशिया ओशियाना गट एकमध्ये दक्षिण कोरियाला नमविणाऱ्या भारतीय संघाला कायम ठेवण्यात आल्याने लिएंडर पेस - रोहन बोपन्ना ही जोडी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताने स्पेनविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण लढतीसाठी अनुभवी लिएंडर आणि देशाचा अव्वल दुहेरी खेळाडू बोपन्ना यांची जोडी कायम ठेवली आहे. यंदा पेस-बोपन्ना यांनी पहिल्यांदा कोरियाविरुद्ध चंदिगड येथील ग्रास कोर्ट लढतीत विजय मिळविला होता.
विशेष म्हणजे, रिओ आॅलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतरही अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीएफ) ४३ वर्षीय पेस आणि बोपन्ना यांच्यावर आपला भरवसा कायम ठेवला आहे. त्याचवेळी एकेरी लढतीसाठी सकेत मिनैनी आणि रामकुमार रामनाथन यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यूएस ओपनमध्ये पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत धडक मारुन लक्षवेधी कामगिरी केलेल्या मिनैनीकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. मंगळवारी एआयटीएच्या एस. पी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या संघाची निवड केली. त्याचप्रमाणे, राखीव खेळाडूंमध्ये प्रजनेश गुणेश्वरम आणि सुमित नागल यांचा समावेश केला आहे. (वृत्तसंस्था)


स्पेनविरुद्ध बाजी मारल्यास, पुढील वर्षी होणाऱ्या १६ संघांच्या एलीट विश्व गटात भारताचा प्रवेश होईल.
डेव्हिस कप स्पर्धेत भारत - स्पेन चौथ्यांदा एकमेकांसमोर उभे राहतील.
त्यात, ५१ वर्षांच्या कालवधीनंतर भारत - स्पेन डेव्हिस कपमध्ये एकमेकांविरुद्ध लढतील.
याआधी झालेल्या १९६५ मध्ये बार्सिलोनामध्ये स्पेनने भारताला ३-२ असे नमवले होते.
१९२७ मध्ये बार्सिलोनामध्येच भारताने स्पेनला ३-२ असे पराभूत केले होते.
तर, १९२२ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये एकमेकांविरुध्द खेळताना स्पेनने ४-१ अशी बाजी मारली होती.
घरच्या मैदानावर हार्डकोर्टवर स्पेनला नमविण्याची भारताकडे चांगली संधी.
दोन्ही युवा एकेरी खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास आणि पेस-बोपन्ना जोडीने आपला जलवा दाखवल्यास २०११ नंतर पहिल्यांदा भारत विश्व गटात पोहोचेल.

Web Title: Bopanna and Paes will play together again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.