बोपन्ना-क्युवासला जेतेपद
By admin | Published: April 24, 2017 12:54 AM2017-04-24T00:54:24+5:302017-04-24T00:54:24+5:30
भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा त्याचा सहकारी पाब्लो क्युवासने अंतिम सामन्यात विजय मिळविताना मोंटेकार्लो मास्टर्स टेनिस
मोनाको : भारताचा रोहन बोपन्ना आणि उरुग्वेचा त्याचा सहकारी पाब्लो क्युवासने अंतिम सामन्यात विजय मिळविताना मोंटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
बोपन्ना आणि क्युवास यांनी बिगरमानांकित फेलिसियानो लोपेझ आणि मार्क लोपेझ या स्पॅनिश जोडीला १ तास १४ मिनिटांपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-३, ३-६, १०-४ असे पराभूत केले.
बोपन्ना आणि क्युवास जोडीचे हे या सत्रातील पहिलेच विजेतेपद आहे. बोपन्नाचे यावर्षीचे हे दुसरे विजेतेपद. यापूर्वी बोपन्नाने जीवन नेदुचेझियनसोबत चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली होती. दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)