अर्जुन पुरस्कारासाठी बोपन्नाची शिफारस
By admin | Published: June 10, 2017 04:43 AM2017-06-10T04:43:40+5:302017-06-10T04:43:40+5:30
रोहण बोपन्नाच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला ‘हॅट्सअप’ करीत अ.भा. टेनिस महासंघाने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी
नवी दिल्ली : रोहण बोपन्नाच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला ‘हॅट्सअप’ करीत अ.भा. टेनिस महासंघाने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्याच नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.
बोपन्नाने काल कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की हिच्या सोबतीने फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकविले होते. एआयटीएचे सचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले,‘आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी बोपन्नाच्या नावाची आधीही अनेकदा शिफारस केली होती पण मागच्या समितीने त्याला पुरस्कार दिला नाही. आता तो या पुरस्काराचा हकदार आहे. यंदा त्याला अर्जुन मिळायलाच हवा. बोपन्नासह रश्मी चक्रवर्ती हिच्या नावाची देखील आम्ही शिफारस केली आहे.’ अर्ज पाठविण्याची तारीख संपली आहे, असे स्मरण करून देताच चॅटर्जी म्हणाले,‘आम्ही आजच नाव पाठविण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष बाब म्हणून नाव पाठविता येते.’ लियांडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा बोपन्ना चौथा भारतीय टेनिसपटू ठरला. एआयटीएने या जेतेपदाबद्दल बोपन्नाची पाठ थोपटताना म्हटले की बोपन्ना जेतेपदाचा हकदार होताच. भविष्यात आणखी विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला शुभेच्छा. युवा आणि प्रतिभावान खेळाडूंसाठी प्रेरणादायी कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)