बोरीवली फु टबॉल : टायगर्स एफसीची दमदार आगेकूच

By admin | Published: July 4, 2016 09:36 PM2016-07-04T21:36:56+5:302016-07-04T21:36:56+5:30

अ‍ॅग्नेलो पिकार्डोने नोंदवलेल्या चार गोलांच्या जोरावर टायगर्स फुटबॉल क्लब संघाने चॅलेंजर्स फुटबॉल संघाचा ६-० असा धुव्वा उडवला.

Borivli Football Club: Tigers FC strong forward | बोरीवली फु टबॉल : टायगर्स एफसीची दमदार आगेकूच

बोरीवली फु टबॉल : टायगर्स एफसीची दमदार आगेकूच

Next

पिकार्डोचा शानदार चौकार

मुंबई : अ‍ॅग्नेलो पिकार्डोने नोंदवलेल्या चार गोलांच्या जोरावर टायगर्स फुटबॉल क्लब संघाने चॅलेंजर्स फुटबॉल संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. यासह टायगर्स एफसीने बोरीवली स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित बोरीवली प्रीमियर लीग स्पर्धेत दमदार आगेकूच केली. अ‍ॅग्नेलो पिकार्डोने पुन्हा एकदा संघासाठी दमदार खेळ करताना सामन्यात ४ गोल झळकावले.


सेंट फ्रान्सिस डीह्णअ‍ॅसीस मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेत टायगर्स संघाने आक्रमक सुरुवात केली. टायगर्सचा भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या अ‍ॅग्नेलो पिकार्डोने १२ व्या मिनिटाला वेगवान गोल करुन संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. चॅलेंजर्सने यानंतर जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, टायगर्सचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.


मध्यांतराला टायगर्स एफसीने १-० आघाडी राखल्यानंतर तुफान हल्ला चढवताना चॅलेंजसर्स एफसीच्या आव्हानातली हवा काढली. पुन्हा एकदा पिकार्डोने प्रतिस्पर्धी संघाच्या कमजोर बचावफळीचा फायदा घेत निर्णायक कामगिरी केली. त्याने यावेळी तीन गोल करताना हॅट्ट्रीक नोंदवली. पिकार्डोच्या चमकदार चौकरामुळे टायगर्सने ४-० अशी भक्कम आघाडी घेतली.


दरम्यान, चॅलेंजर एफसीचे खेळाडू गोल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र टायगर्सची भक्कम बचावफळी आणि चोख गोलरक्षण यांच्यापुढे ते हतबल ठरले. त्यातच शेवटच्या दोन मिनिटांत जयेश नायर आणि शिवांश राव यांनी प्रत्येकी एक गोल झळकावून टायगर्स एफसीच्या ६-० अशा दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.


तत्पूर्वी झालेल्या सामन्यात रोअर्क कुटीन्हो याने झळकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना रेमाकीन एसए संघाने शेलार एफसीचा १-० असा पराभव केला.

Web Title: Borivli Football Club: Tigers FC strong forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.