गोलंदाजांनी निराश केले : हरभजन

By admin | Published: June 21, 2017 01:04 AM2017-06-21T01:04:16+5:302017-06-21T01:04:16+5:30

पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत.

Bowlers disappointed: Harbhajan | गोलंदाजांनी निराश केले : हरभजन

गोलंदाजांनी निराश केले : हरभजन

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी भारतीय गोलंदाज दोषी आहेत. त्यांनी मोक्याच्या क्षणी निराश केले, असे मत अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले.
हरभजन म्हणाला, ‘मधल्या षटकांमध्ये बऱ्याच धावा फटकावल्या गेल्या आणि फिरकीपटू बळी घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली.
आयीसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभामध्ये हरभजनने म्हटले की, ‘आमच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी निराश केले. आम्ही सुरुवात चांगली केली नाही आणि फिरकीपटू महागडे ठरले. त्यांना बळीही घेता आले नाही. आमचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार नव्हते. प्रयत्न करण्यापेक्षा केवळ चमत्काराची आशा करणे, अशीच ही कामगिरी होती. मधल्या षटकांमध्ये धावा बहाल केल्यामुळे नुकसान झाले. पाकने पहिल्या चेंडूपासून आक्रमण केले. त्यांनी भारताविरुद्धच्या लढतीसाठीच सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवली होती, असे वाटत होते.’
हरभजन पुढे म्हणाला, ‘फखर झमानला बाद केले तो बुमराहचा चेंडू नो-बॉल होता. त्याचे मोल संघाला द्यावे लागले. झमानने ११४ धावांची खेळी करीत पाकच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. ’ (वृत्तसंस्था)

Web Title: Bowlers disappointed: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.