सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व

By admin | Published: April 23, 2017 02:57 AM2017-04-23T02:57:09+5:302017-04-23T03:07:48+5:30

आयपीएलमध्ये ऐरवी होणारे सामने हे फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असेच असतात. केवळ चौकार आणि षटकारांची बरसात, हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मुंबई इंडियन्स

Bowlers dominate the match | सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व

सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व

Next

- आकाश नेवे

आयपीएलमध्ये ऐरवी होणारे सामने हे फलंदाजी विरुद्ध फलंदाजी असेच असतात. केवळ चौकार आणि षटकारांची बरसात, हे आयपीएलचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअर डेविल्स हा सामना याला अपवाद ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईला १४२ धावात रोखले आणि मुंबईच्या शिलेदारांनी दिल्लीला ही कमी असलेली धावसंख्यादेखील गाठू दिली नाही.
दिल्लीचा कर्णधार जहीर खान याच्यासाठी मुंबईचे वानखेडे स्टेडिअम हे होम ग्राउंडच आहे, त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. मुंबईचा सलामीवीर जोश बटलर हा टी २० त आवश्यक असलेला स्ट्राईक रेट राखण्यात यशस्वी झाला. बटलरने १५५ च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. पोलार्ड, कृणाल आणि हार्र्दिक यांनी फक्त धावसंख्या वाढवली.


या सामन्यानंतर मुंबई गुणतक्त्यात आघाडीवर टिकून आहे. मुंबईने सात सामन्यात सहा विजय मिळवले आहेत.
तर पर्पल कॅप सनरायजर्सच्या भुवनेश्वर कुमारकडे आहे. त्याने ७ सामन्यात १६ बळी घेतले आहेत. तर हैदराबादचाच कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आज पुन्हा आॅरेंज कॅप पटकावली.

Web Title: Bowlers dominate the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.