गोलंदाजांनी बिघडविले पंजाबचे संतुलन

By Admin | Published: May 9, 2017 12:30 AM2017-05-09T00:30:08+5:302017-05-09T00:30:08+5:30

केकेआरविरुद्ध अनेकजण किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयाचा दावेदार मानायला तयार नाहीत, याची दोन कारणे आहेत. एकतर गौतम गंभीरचे

Bowlers spoiled Punjab's balance | गोलंदाजांनी बिघडविले पंजाबचे संतुलन

गोलंदाजांनी बिघडविले पंजाबचे संतुलन

googlenewsNext

रवी शास्त्री लिहितात...
केकेआरविरुद्ध अनेकजण किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयाचा दावेदार मानायला तयार नाहीत, याची दोन कारणे आहेत. एकतर गौतम गंभीरचे सहकारी ‘पॉवर प्ले’मध्ये जबर कामगिरी करतात. दुसरे कारण म्हणजे पंजाबच्या गोलंदाजांमधील सातत्याचा अभाव. दोन्ही संघ महिनाभरापूर्वी ईडन गार्डनमध्ये परस्परांविरुद्ध खेळले, त्या वेळी उभय संघांमध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. तेव्हापासून दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेत फार काही बदल झालेले नाहीत.
केकेआर संघ अद्यापही ‘पॉवर प्ले’मध्ये बलाढ्यच आहे. सुरुवातीला पंजाबची घसरगुंडीदेखील कायम आहे. सुनील नारायण सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ख्रिस लीन तर आजारातून उठलेला बालक आईस्क्रिमवर तुटून पडावा, तसा
खेळात मुसंडी मारताना दिसत आहे. पंजाबसाठी संदीप शर्मा आणि अक्षर पटेल हे हुकमी एक्के ठरले. या दोघांची बहारदार कामगिरी सुरूच आहे. तरीही समस्या कायम आहे. हे दोन्ही गोलंदाज आपापल्या वाट्याचे केवळ चार-चार षटके टाकू शकतात.
सुरुवातीच्या षटकांमध्ये दोघांचा वापर झाल्यास नंतरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाज मोठ्या प्रमाणावर धावा वसूल करतात. या दोन्ही गोलंदाजांपासून चेंडू दूर असेल तर प्रतिस्पर्धी फलंदाजांचे चांगलेच फावते, असे चित्र आहे. पंजाबचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारतात पण विजय मिळवून देण्यात गोलंदाज अपयशीच ठरत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हशिम अमलाच्या नावावर दोन शतकांची नोंद झाली. तो शैलीदार आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाज मानला जातो. अन्य फलंदाजही धावांचे योगदान देतच आहेत. पण पंजाबचा गोलंदाजी मारा विजयाची सर्व समीकरणे बिघडवून टाकतो.
केकेआरविरुद्धची लढत मोलाची असेल. पंजाब अद्याप ‘प्ले आॅफ’मधून बाहेर झालेला नाही. दुसरीकडे केकेआरदेखील या सामन्यात गाफिल राहणार नाही. केकेआरने आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान न पटकविल्यास या संघाचे खेळाडू स्वत:ला दोष देतील यात शंका नाही. केकेआरचा पुढचा सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सविरुद्ध असल्यामुळे त्याआधी पंजाबवर विजय मिळविणे हेच लक्ष्य केकेआरने आखले असावे. (टीसीएम)

Web Title: Bowlers spoiled Punjab's balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.