बॉक्सर मनोज कुमारचा विजयी 'पंच'

By admin | Published: August 11, 2016 06:50 AM2016-08-11T06:50:21+5:302016-08-11T06:58:52+5:30

पुरुषांच्या ६४ किलो वजनी गटाच्या सामन्यात मनोजकुमारने लिथुएनियाच्या एव्हाल्डास पेट्राउस्कासचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह मनोजकुमारने प्री कॉर्टर धडक मारली आहे.

Boxer Manoj Kumar's winning 'Punch' | बॉक्सर मनोज कुमारचा विजयी 'पंच'

बॉक्सर मनोज कुमारचा विजयी 'पंच'

Next
>ऑनलाइन लोकमत
रिओ दी जनैरो, दि. ११ : भारताचा बॉक्सर मनोजकुमारने रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे. पुरुषांच्या ६४ किलो वजनी गटाच्या सामन्यात मनोजकुमारने लिथुएनियाच्या एव्हाल्डास पेट्राउस्कासचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह मनोजकुमारने प्री कॉर्टर फायनलमध्ये (उप उपांत्यपुर्व) धडक मारली आहे. त्याची पुढील लढत उझबेकिस्तानच्या फजलद्दीनशी होणार आहे.
 
२९ वर्षांच्या मनोजकुमारने या सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. विकासनं पहिल्या फेरीत १ गुणांची आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. रोमांचिक लढतीत मनोजकुमारने विजय मिळवला. राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यातील तिन्ही फेरीतील आघाडीसह मनोजकुमारने ३-० ने विजय मिळवत सामना विजयी पंच मारला. 
 
सामन्यात मनोजने आपल्या उंचीचा फायदा घेत सुरुवाती पासूनच चांगला खेळ करत लिथुनियाच्या एव्हल्डास नमवून सर्व भारतीयांच्या पदकाच्या आशा जिवित ठेवल्या. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आत्तार्यंत एकही पदक मिळवता आलेले नाही. काल झालेल्या सामन्यात भारताच्या विकास यादवने (७५ किलो) बॉक्सिंगमध्ये अमेरिकेच्या चार्ल्स् कोनवेलचा पराभव करुन भारताला विजय मिळवून दिला यामुळेच, भारताला बॉक्सिंगमधून पदकाच्या खूप अपेक्षा आहेत.

Web Title: Boxer Manoj Kumar's winning 'Punch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.