गोल्डन पंच लगावण्यात बॉक्सर्स अपयशी

By admin | Published: August 4, 2014 03:07 AM2014-08-04T03:07:05+5:302014-08-04T03:07:05+5:30

ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या चार खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली; पण त्यांपैकी एकाही बॉक्सरला गोल्डन पंच लगावण्यात यश आले नाही

Boxers fail to turn golden punches | गोल्डन पंच लगावण्यात बॉक्सर्स अपयशी

गोल्डन पंच लगावण्यात बॉक्सर्स अपयशी

Next

ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या चार खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली; पण त्यांपैकी एकाही बॉक्सरला गोल्डन पंच लगावण्यात यश आले नाही. चार वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी तीन सुवर्ण व चार कांस्यपदके पटकावताना एकूण सात पदकांची कमाई केली होती. यावेळी मात्र भारतीय बॉक्सर्सना चार रौप्य व एका कांस्यपदकासह एकूण पाच पदकांवर समाधान मानावे लागले. भारताला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची आशा होती; पण शनिवारी रात्री एकापाठोपाठ चारही भारतीय बॉक्सर्सना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तीन बॉक्सर्स अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर आॅलिम्पिक पदक विजेत्या विजेंदरकडून सुवर्णपदकाची आशा होती; पण विजेंदर त्यात अपयशी ठरला.
विजेंदरला ७५ किलो वजनगटात इंग्लंडच्या अ‍ॅन्थोली फाउलरविरुद्ध
१-२ ने पराभव स्वीकारावा लागला. विजेंदरलाही अन्य भारतीय बॉक्सर्सप्रमाणे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विजेंदरला फाउलरविरुद्ध पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये २६-३०, २७-३० ने पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या व अंतिम फेरीत विजेंदरने संघर्षपूर्ण खेळ करीत ३०-२७ असा स्कोअर नोंदविला.

Web Title: Boxers fail to turn golden punches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.