बॉक्सिंग इंडियाला मान्यता द्यावी
By admin | Published: December 24, 2014 01:50 AM2014-12-24T01:50:08+5:302014-12-24T01:50:08+5:30
भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला मान्यता द्यावी, अशी सूचना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) अध्यक्ष डॉ़ चिंग कू वू यांनी केली आहे़
लुसाने : भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला मान्यता द्यावी, अशी सूचना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) अध्यक्ष डॉ़ चिंग कू वू यांनी केली आहे़ आयओएने मान्यता देण्यास विरोध करणे हे आॅलिम्पिक चार्टरच्या विरुद्ध असल्याचे ते म्हणाले़
बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुकीसंदर्भात अनेक तक्रारी आल्याचे कारण पुढे करीत भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्यास विरोध केला आहे़ विशेष म्हणजे बॉक्सिंग इंडियाची निवडणूक एआयबीएच्या पर्यवेक्षकाच्या निगराणीखाली पार पडली होती़ तरीही आयओए मान्यता देण्यास विरोध करीत आहे़ वू पुढे म्हणाले, या मान्यतेस सरकारचे काहीच देणेघेणे नाही़ कारण एआयबीए राष्ट्रीय महासंघाला मान्यता देते़ आयओएची भूमिका ही आॅलिम्पिक चार्टरच्या विरुद्ध आहे़