...तर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा दौऱ्यावर बहिष्कार
By Admin | Published: July 3, 2017 01:14 AM2017-07-03T01:14:24+5:302017-07-03T01:14:24+5:30
नव्या करारावर सहमती झाली नाही तर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बहिष्कार टाकतील, असे आॅस्ट्रेलिया खेळाडू
सिडनी : नव्या करारावर सहमती झाली नाही तर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बहिष्कार टाकतील, असे आॅस्ट्रेलिया खेळाडू संघटनेने (एसीए) स्पष्ट केले आहे.
खेळाडूंच्या संघटनेने सिडनीमध्ये एक तातडीची बैठक बोलविली. त्यात त्यांनी १२ जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या दौऱ्यासाठी कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. नव्या करारपत्रावर (एमओयू) स्वाक्षरी होणार नाही तोपर्यंत खेळाडू या दौऱ्याबाबत निर्णय घेणार नाही. शुक्रवारपर्यंत नव्या करारपत्रावर स्वाक्षरीबाबतचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याला प्रत्युत्तर देताना सीएने स्पष्ट केले की, ‘आम्ही कुठल्याही खेळाडूला आॅस्ट्रेलिया संघाकडून खेळण्यास बाध्य करू शकत नाही.
आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघासाठी हा एक विकास दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने खेळाडूंना वरच्या पातळीवर आपली छाप सोडण्याची संधी मिळत असते. (वृत्तसंस्था)
त्यामुळे खेळाडू दौऱ्यावर जाणार नसल्याचे कळल्यानंतर आश्चर्य वाटते. दरम्यान, सीएने कुणालाही आॅस्ट्रेलिया संघाकडून खेळण्यास बाध्य केलेले नाही आणि करणारही नाही.’