पेणमधील मुलांनी केला २३३ किलोमीटर अंतरपोहून पार करण्याचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 11:35 PM2020-01-08T23:35:13+5:302020-01-08T23:35:20+5:30

पेण येथील सहा मुलांनी रिले पद्धतीने धरमतर ते एलिफंटा हे २३३ किलोमीटर अंतर सलग सहा वेळा ७५ तास ७ मिनिटे आणि ५५ सेकंदात पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

The boys in Pen set a record for crossing 233 km | पेणमधील मुलांनी केला २३३ किलोमीटर अंतरपोहून पार करण्याचा विक्रम

पेणमधील मुलांनी केला २३३ किलोमीटर अंतरपोहून पार करण्याचा विक्रम

Next

वडखळ : पेण येथील सहा मुलांनी रिले पद्धतीने धरमतर ते एलिफंटा हे २३३ किलोमीटर अंतर सलग सहा वेळा ७५ तास ७ मिनिटे आणि ५५ सेकंदात पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भावेश कडू (१२), नील वैद्य (१२), मधुरा पाटील (१२), श्रवण ठाकूर (१४), अथर्व लोधी (१४) आणि सोहम पाटील (१३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी धरमतर बंदरावरून समुद्रात उड्या मारल्या आणि बुधवार, ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी धरमतर ते एलिफंटा हे अंतर तीन रात्र आणि चार दिवस असे सलग पार करीत असताना भरती-ओहोटीचा सामना करत, समोरून येणाऱ्या लाटांचा मारा सहन करत आणि निसर्गातील विविध पद्धतीच्या बदलांवर मात केली. आजपर्यंत अशा प्रकारे रिले पद्धतीने १६६ किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचा विक्रम रचला गेला आहे. मात्र, आज यांनी २३३ किलोमीटरचे अंतर पार करून देशातील रिले पद्धतीने सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करण्याचा विक्रम रचला आहे.
>बेस्ट आॅफ इंडिया आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल, अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांच्या या मेहनतीला दाद द्यावी तेवढी कमीच.
- संतोष पाटील, आयोजक
सराव फार कठीण होता, कोणत्याही समस्यांवर मात करता यावी, यासाठी मी दिवसाबरोबरच रात्रीदेखील या विद्यार्थ्यांचा समुद्रात पोहोण्याचा सराव घ्यायचो आणि ते त्यात यशस्वीदेखील झाले आहेत.
- हिमांशू मलबारी, प्रशिक्षक
>समोरून येणाºया सागरी लाटा, लागणारे करंट यांचा सामना करत आम्ही अंतर पार करत होतो, त्यातच रात्री पडलेली कडाक्याची थंडी हेसुद्धा आव्हान तेवढेच मोठे होते; पण या सर्वांवर मात करून आज आम्ही हे यश प्राप्त केले आहे त्याबद्दल समाधान वाटते. - स्पर्धक विद्यार्थी

Web Title: The boys in Pen set a record for crossing 233 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.