ब्राव्होने दिली टीम इंडियाला मेजवानी

By admin | Published: June 27, 2017 12:49 AM2017-06-27T00:49:09+5:302017-06-27T00:49:09+5:30

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संबंध अधिक सलोख्याचे आहेत. आयपीएलच्या सत्रात अनेकदा त्याची प्रचिती आली आहे.

Bravo gave India team to bowl | ब्राव्होने दिली टीम इंडियाला मेजवानी

ब्राव्होने दिली टीम इंडियाला मेजवानी

Next

पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संबंध अधिक सलोख्याचे आहेत. आयपीएलच्या सत्रात अनेकदा त्याची प्रचिती आली आहे. सध्या पुन्हा एकदा त्याची अनुभूती येताना दिसते. फक्त यावेळी ठिकाण वेगळे आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मोकळ्या वेळेत भारतीय क्रि केटर्सना ब्राव्होने त्याच्या घरी मेजवानी दिली.
ब्राव्होच्या घरी मेजवानीला गेल्याचा फोटो भारतीय सलामीवीर शिखर धवनने टिष्ट्वटरवर शेअर केले आहेत. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासोबत ब्राव्होदेखील दिसत आहे. टी-२० विश्वचषकानंतर ब्राव्हो चॅम्पियन्स या गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता.
शिखर धवनशिवाय ब्राव्होने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनदेखील भारतीय संघातील खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार दिसत आहेत. एका फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी, धोनीची छोटी मुलगी झीवा याच्यासोबत ब्राव्होची आईदेखील दिसते. या फोटोला ब्राव्होने कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, ‘रविवारी रात्री माझा भाऊ महेंद्रसिंग धोनी, त्याची मुलगी आणि माझी आई आम्ही एकत्र माझ्या घरात होतो. हा क्षण खूपच आनंददायी होता.’ भुवनेश्वरसोबतच्या फोटोला कॅप्शन देताना ब्राव्होने आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयपीएलच्या सत्रात दोनवेळा ‘पर्पल कॅप’चे मानकरी ठरल्याचा उल्लेख त्याने कॅप्शनमध्ये केला.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ब्राव्हो, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व युवा भारतीय खेळाडूंसोबत दिसला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाल्यानंतर धोनी आणि संघाचे स्वागत करण्यासाठी ब्राव्होने टिष्ट्वटदेखील केले. ब्राव्हो धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला. तसेच यंदाच्या आयपीएल सत्रात तो सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Bravo gave India team to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.