किंग्ज इलेव्हन पंजाबला ब्राव्होने रोखले, गुजरात लायन्सला विजयासाठी १६२ धावांची गरज
By admin | Published: April 11, 2016 09:43 PM2016-04-11T21:43:16+5:302016-04-11T21:59:33+5:30
ड्वेन ब्राव्होने केलेल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला १६१ धावावर ऱोखले. ड्वेन ब्राव्होने ४ षटकात २२ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले
Next
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ११ - ड्वेन ब्राव्होने केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला १६१ धावांवर ऱोखले. ड्वेन ब्राव्होने ४ षटकांत २२ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले. तर रवींद्र जडेजाने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार रैनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरुवातील महागात पडला. पण ब्राव्हो आणि जडेजाने अफलातून गोलंदाजी करत पंजाबला माठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
मनन व्होरा (३८), मुरली विजय(४२), मार्क्स स्टोइनिस(३३), वृद्धिमान साहा(२०) आणि डेव्हिड मिलर (१५) यांच्या खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या असून, गुजरात लायन्सला विजयासाठी २० षटकात १६२ धावांची गरज आहे. मनन व्होरा आणि मुरली विजय यांनी धडाकेबाज सलामी देताना पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ७८ धावांची सलामी दिली. सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्येला खीळ बसवण्यात गुजरातचे गोलंदाज यशस्वी ठरले. जडेजाने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला.
हा सामना जिंकून आयपीएलच्या विजयाची बोहणी करण्याची गुजरात लायन्सची इच्छा आहे. तर २०१५ मध्ये पंजाबवर जी पराभवाची नामुष्की आली होती तशी गत होऊ न देण्याचा त्यांचा निर्धार आहे. गुजरात आणि पुणे हे दोन नवे संघ चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स बरखास्त झाल्यानंतर निर्माण करण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये प्रथमच सुरेश रैनाला आपले नेतृत्व दाखवण्याची संधी निर्माण झाली आहे.
प्रतिस्पर्धी संघ -
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), मनन व्होरा, मुरली विजय, ग्लेन मॅक्सवेल, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, प्रदीप साहू, मिचेल जॉन्सन, संदीप शर्मा, मोहित शर्मा
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), रवींद्र जडेजा, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, एरॉन फिंच, ब्रँडन मॅक्युलम, दिनेश कार्तिक, ईशान किशन, प्रवीणकुमार, प्रदीप सांगवान, सरबजित लड्ढा