‘ब्राव्हो’चा कसोटीला गुडबाय
By admin | Published: January 31, 2015 11:23 PM2015-01-31T23:23:14+5:302015-01-31T23:23:14+5:30
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने कसोटी कारकिर्दीला गुडबाय केला आहे; पण वन-डे आणि टी-20 सामने मात्र खेळतच राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.
पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने कसोटी कारकिर्दीला गुडबाय केला आहे; पण वन-डे आणि टी-20 सामने मात्र खेळतच राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. ३१ वर्षीय ब्राव्होे २0१0पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
४0 कसोटी आणि १६४ वन-डे सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करणारा ब्राव्हो म्हणाला, ‘‘आज मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला याची मी कल्पना या अगोदरच दिली आहे.’’ त्याचबरोबर मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळतच राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. आपल्या अष्टपैलू खेळामुळे विंडीज संघाचा महत्त्वाचा घटक असणारा ब्राव्हो हा बंडखोर खेळाडू म्हणून ओळखला जातो. खेळाडूंच्या मानधनाच्या प्रश्नावरून झालेल्या वादातून त्याच्या नेतृत्वाखालील संघाने भारत दौरा अर्धवट सोडला होता. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने विंंडीज मंडळावर नुकसानभरपाईची मागणी केली आहे. आधीच डबघाईला आलेल्या ‘डब्ल्यूआयसीबी’ला यामुळे मोठा तोटा सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. या सर्वांच्या मुळाशी ब्राव्हो असल्याचा समज मंडळाचा झाल्यामुळे ब्राव्होला विश्वकप संघातून वगळण्यात आले होते.
ब्राव्होची कारकीर्द
सामनेडावधावासर्वोच्च अर्धशतकेशतकेसरासरी
कसोटी४0७१२२00११३१३0३३१.४२
वन-डे१६४१४१२९६८१२२*१00२२५.३६
टी-२00५३0४८0९३६६६*0३00२५.२९