Legend Pele Hospitalized: फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी! पेले यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 10:08 PM2022-12-03T22:08:14+5:302022-12-03T22:08:56+5:30
उपचारांचा शरीराच्या अवयवांवर परिणाम होत नसल्याची माहिती
Legend Pele Hospitalized: कतारमध्ये सुरू असलेल्या FIFA World Cup 2022 दरम्यान, फुटबॉल चाहत्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती अतिशय नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांना सामान्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु केमोथेरपीचा त्यांच्या शरीराच्या अवयवांवर परिणाम होत नसल्याचे सांगितले जात आहे. या कारणास्तव, त्यांना आता पॅलिएटिव्ह केअरमध्ये (palliative care) हलवण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्यास या ठिकाणी रूग्णास दाखल करून उपचार केले जातात.
Pelé no longer responds to chemotherapy & is under palliative care to avoid pain & shortness of breath.
— ⋆𝗡𝗲𝘆𝗺𝗼𝗹𝗲𝗾𝘂𝗲 🇧🇷 (@Neymoleque) December 3, 2022
There is no longer any treatment for the bowel cancer, which has metastasized to Pelé’s lungs & liver.
Prayers for the King of football 🤴🏿🙏🏼 pic.twitter.com/PAEXUlzx1f
अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पेले यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे. त्यांच्यावर केमोथेरपीचा कोणताही परिणाम होत नाही. पेले कर्करोगाशी झुंज देत आहेत. पेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले, परंतु त्यांची मुलगी केली नॅसिमेंटो यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या बातम्या ब्राझीलच्या मीडियाच्या हवाल्याने देण्यात येत आहेत.
जगभरातील लोकांकडून प्रार्थना केल्या जात आहेत
Love for #Pele from Doha 🇧🇷❤️#FIFAWorldCuppic.twitter.com/vuavjAgA34
— Wael Jabir (@waeljabir) December 3, 2022
पेले यांची अवस्था पाहून जगातील अनेक फुटबॉलपटूंनी ट्विट करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सचा युवा स्टार कायलिन एमबाप्पे पेलेसाठी प्रार्थना करत असून इतरांनीही आवाहन केले आहे. माजी ब्राझिलियन स्टार फुटबॉलपटू रिवाल्डोने लिहिले आहे- 'किंग ऑफ फुटबॉल' (पेले) लवकर बरे होऊदेत. फुटबॉल विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही पेले यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहेत. कतार विश्वचषकाच्या आयोजकांनीही पेलेसाठी प्रार्थना केली आणि दोहामधील एका इमारतीवर लेझर लाइटद्वारे त्यांचे चित्र दाखवून 'लवकर बरे व्हा' असे म्हटले आहे.