फुटबॉलमध्ये ब्राझीलने पटकावले सुवर्णपदक
By admin | Published: August 21, 2016 05:57 AM2016-08-21T05:57:06+5:302016-08-21T07:16:39+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २१ - रिओ ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे.
रिओ ऑलिम्पिकमधील ब्राझील आणि जर्मनी यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघ अतिरिक्त वेळेपर्यंत १-१ अशा बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने शेवटचा गोल करुन जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. ब्राझीलने या विजयामुळे पहिल्यांदाच सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. ब्राझिलला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर नेमारने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
ब्राझीलने गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र सुवर्णपदकापर्यंत मजल मारता आली नव्हती.