Mary Kom : भारताला मोठा धक्का, मेरी कोमची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:13 PM2022-06-10T18:13:39+5:302022-06-10T18:14:11+5:30
Mary Kom out of CWG selection trail - ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर मेरी कोमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे
Mary Kom out of CWG selection trail - ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर मेरी कोमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ४८ किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत नितू विरुद्धच्या सामन्यात मेरीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरीला आता पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
हरयाणाच्या नितूने चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१८मध्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ३९ वर्षीय मेरीने दुखापत झाली असूनही काही काळ सामन्यात संघर्ष दाखवला, परंतु तिला संतुलन राखणे अवघड होत होते. त्यामुळे तिला रिंगमधून स्ट्रेचवरून न्यावे लागले आणि रेफरीने नितूला विजयी घोषित केले. मेरीला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.
Commonwealth Games 2022 के ट्रायल्स में #MaryKom को हरियाणा की नीतू ने हराया... रिंग से उठाकर ले जाना पड़ा MaryKom को pic.twitter.com/OqNFsmOTH0
— Dr. Vimal Mohan (@Vimalsports) June 10, 2022
UPDATE🚨
On day 2 of the ongoing CWG trials in New Delhi, @MangteC suffered an injury. She twisted her left knee in round 1 of the bout against Nitu (48 kg). The injury forced her to stop the bout & she has been ruled out of the #CWG2022.
Wishing her a speedy recovery!#Boxingpic.twitter.com/ygisAZONZZ— Boxing Federation (@BFI_official) June 10, 2022