Breaking : मराठमोळ्या राहुल आवारेला कांस्यपदक; भारताला पाचवे पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 06:02 PM2019-09-22T18:02:40+5:302019-09-22T18:02:54+5:30
महाराष्ट्राच्या राहुल आवारने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
महाराष्ट्राच्या राहुल आवारने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे पदक ठरले. यापूर्वी दीपक पुनियाने दुखापतीमुळे 86 किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Breaking News:
— India_AllSports (@India_AllSports) September 22, 2019
Bronze medal for Rahul Aware as he beats former Pan American Champion Tyler Lee Graff 11-4 in Bronze medal bout (61 kg) of World Wrestling Championships #WrestleNurSultanpic.twitter.com/pj2f8HYHOi
राहुल आवारेने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. नुकतेच 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले. राष्ट्रकुल स्पर्धेत त्यानं 57 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता, परंतु त्या जागतिक स्पर्धेत 61 किलो वजनी गटात खेळावे लागणार आहे.