ब्रेन्डन मॅक्युलमचा डबल धमाका
By admin | Published: November 30, 2014 01:58 AM2014-11-30T01:58:43+5:302014-11-30T01:58:43+5:30
न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या तिस:या आणि अखेरच्या कसोटीत तिस:या दिवसअखेर तब्बल 286 धावांची आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मिळविली आह़े
Next
शारजा : ब्रेन्डन मॅक्युलमचे (2क्2) शानदार द्विशतक आणि केन विलियमसनची 192 धावांची धडाकेबाज खेळी या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या तिस:या आणि अखेरच्या कसोटीत तिस:या दिवसअखेर तब्बल 286 धावांची आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मिळविली आह़े
न्यूझीलंडकडून मॅक्युलमने 188 चेंडूंना सामोरे जाताना 21 चौकार आणि 11 षटकार लगावल़े तर केनने 244 चेंडूंना सामोरे जाताना 23 चौकार आणि 1 षटकार लगावला़ या दोघांच्या शानदार खेळीच्या बळावर न्यूझीलंडने तिस:या दिवसअखेर 8 बाद 637 धावा केल्या आह़े
पाकिस्तानने पहिल्या डावात 351 धावा केल्या होत्या़ अशा प्रकारे न्यूझीलंडने 286 धावांनी आघाडी मिळविली आह़े त्यांचे आणखी दोन गडी शिल्लक आहेत़ न्यूझीलंडला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी विजयाची गरज आह़े पाकने पहिल्या कसोटी 248 धावांनी विजय मिळविला होता़ तर दुसरा सामना ड्रॉ झाला होता़
या लढतीत न्यूझीलंडने तब्बल 19 षटकार लगावल़े हा एक विश्व विक्रम ठरला आह़े यापुर्वी ऑस्ट्रेलियाने 2क्क्3 मध्ये ङिाम्बाब्वेविरूद्धच्या कसोटीत 17 षटकार खेचले होत़े न्यूझीलंडच्या रॉस टेलर, कोरी अँडरसन, टिम साउथी यांनी ही अर्धशतकी खेळी केली़ दरम्यान मॅक्युलम एका वर्षात तीन द्विशतक साजरे करणारा जगातला चौथा खेळाडू ठरला आह़े (वृत्तसंस्था)