नॅथन लियॉनने मोडला ब्रेट लीचा विक्रम
By admin | Published: March 4, 2017 04:33 PM2017-03-04T16:33:16+5:302017-03-04T16:33:16+5:30
भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवणारा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 4 - दुस-या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवणारा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. भारताच्या आठ फलंदाजांना तंबूत पाठवणा-या लियॉनने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीचा विक्रम मोडीत काढला.
भारताविरोधात सर्वाधिक विकेट घेण्याचा ब्रेट लीचा विक्रम त्याने मोडला. भारता विरोधात खेळताना ब्रेट लीने 53 विकेट घेतल्या होत्या. लियॉनच्या खात्यात 58 विकेट जमा झाल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात लियॉनने चांगली गोलंदाजी केली होती. पण ओकेफीच्या कामगिरीसमोर त्याचे प्रदर्शन झाकोळले गेले.
आणखी वाचा
भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळून काढण्यात माहिर समजले जातात. पण लियॉनच्या वळणा-या चेंडूंसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरक्ष शरणागती पत्करली. लियॉनने चेतेश्वर पूजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य राहाणे, आर.अश्विन, वृद्धीमान सहा, रविंद्र जाडेजा, लोकेश राहुल आणि इशांत शर्मा यांच्या विकेट घेतल्या.