ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:19 AM2018-10-23T04:19:21+5:302018-10-23T04:19:25+5:30
जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
पुणे : जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ब्रिज आणि पॅरा खेळाडूंच्या नावाचा विसर क्रीडा खात्याला पडला आहे. मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात नेमबाजी, कबड्डी, सेलिंग, नौकानयन आणि शुटिंग आणि स्कॉश या खेळातील पदकविजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण ३ कोटी ७२ लाख रोख पुरस्कारांचे वाटप क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलात दुपारी होणाºया या कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडामंत्री उपस्थित राहतील. विविध राज्यांनी आपल्या पदकविजेत्यांना रोख पारितोषिकांची घोषणा केली, त्या वेळी महाराष्ट्रानेही आपल्या सुवर्ण पदक विजेत्यांना ५० लाख व मार्गदर्शकाला १२ लाख, रौप्य विजेत्यांना ३० लाख व मार्गदर्शकाला ७ लाख, कांस्य विजेत्यांना २० लाख व मार्गदर्शकाला ५ लाख रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. ‘खेलो महाराष्ट्र’ क्रीडा स्पर्धा संदर्भात होणाºया बैठकीनंतर या खेळाडूंना रोख गौरविण्यात येईल. पण, आशियाई स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज स्पर्धेत भारताने १ सुवर्ण व २ कांस्य पटकावली. यात कांस्य जिंकणाºया संघात महाराष्ट्रातील काही खेळाडू होते. तसेच, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सुयश जाधवसह काही खेळाडूंनी पदके जिंकली होती. या खेळाडूंचा विसर शासन व क्रीडा खात्याला पडल्यामुळे हे खेळाडू मंगळवारी होणाºया कार्यक्रमापासून वंचित राहतील.