नरसिंह यादवची लढाई शेवट पर्यंत लढणार : ब्रिजभूषण सिंग
By admin | Published: August 17, 2016 05:39 AM2016-08-17T05:39:11+5:302016-08-17T05:39:11+5:30
भारतीय संघाचा कुस्तीपटू नरसिंह यादव याची कोर्टाची लढाई आम्ही येथे शेवट पर्यंत लढणार असून त्याला न्याय मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे.
शिवाजी गोरे
रिओ, दि. १७ : भारतीय संघाचा कुस्तीपटू नरसिंह यादव याची कोर्टाची लढाई आम्ही येथे शेवट पर्यंत लढणार असून त्याला न्याय मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे असे भारतीय कुस्ती महासंघाचे प्रेसिडन्ट ब्रिजभूषण सिंह यांनी लोकमतला संगितले. नाडा ने पाठविलेला अहवालावर वाडाची सुनावणी आहे. आमचे वकील रिओला येऊ शकत नाहीत, त्यामुळे ते दिल्लीतूनच फोन किंवा कॉन्फ्रान्सवर आमचे म्हणणे मांडतील. भारतीय ऑलिम्पिकचे सचिव राजीव मेहता यांनी येथे एक वकील दिला आहे. तो आमची बाजू मांडणार आहे.
काल नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी 18 रोजी होण्याची शक्यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत 19 ऑगस्टला आहे.
सुनावणी 18 रोजी आहे नरसिंहची लढत 19 रोजी होणार आहे. आम्हला खात्री आहे की नरसिंह नक्की खेळेल आणि भारताला पदक जिंकून देईन. पुढे बोलताना ब्रिजभूषण म्हणाले, सत्य मानसिक त्रास देतो, पण मानसाला पराभूत करत नाही. माझा नरसिंहवर पुर्णपणे विश्वास आहे. त्याला यश मिळेल सत्य मानसिक त्रास देते, पण मानसाला पराभूत करत नाही. माझा नरसिंहवर पुर्णपणे विश्वास आहे. या स्पर्धेत त्याला यश मिळेल.