बीसीसीआयकडून पुजारा, हरमनप्रीतची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
By Admin | Published: May 2, 2017 05:38 PM2017-05-02T17:38:40+5:302017-05-02T17:38:40+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 02 - भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देशातील प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर पुजारासोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर हिची सुद्धा या पुस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्याची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात 1316 धावांची खेळी केली आहे. ती म्हणजे इतर भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक जास्त आहे. तसेच, आत्तापर्यंतच्या कसोटीच्या कारकिर्दित त्याने 48 कसोटी सामन्यात 3798 धावा केल्या आहेत. तर, हरमनप्रीत सिंग ही भारतीय महिला क्रिकेट संघाची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात आणि महिला आशिया कपमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती.
याचबरोबर, ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनकडून (एआयएफएफ) ओइनाम बेमबेम देवी, जेजे लालपेखलुआ और गुरप्रीत संधू यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा कोणाचीही शिफारस केलेली नाही.