ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:43 AM2019-02-19T11:43:20+5:302019-02-19T11:45:42+5:30

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात नवीन कार दाखल झाली आहे.

British boxer Chris Eubank Jr. flaunts his shiny new £220,000 McLaren | ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री

ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री

Next

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात नवीन कार दाखल झाली आहे. लंडन येथील O2 येथील अरेनात ख्रिस सुपर मिडलबेड कॅटेगरीत जेम्स डेगालेचा सामना करणार आहे. 2016 व 2017 मध्ये त्याने IBO सुपर- मिडलवेट गटाचे जेतेपद नावावर करणाऱ्या ख्रिसला जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी डेगालेशी मुकाबला करावा लागणार आहे. रविवारी हा सामना होणार आहे, परंतु तत्पूर्वी ख्रिसने आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मॅक्लॅरेनचा समावेश केला आहे.

ख्रिसने मॅक्लॅरेन 720S ही जवळपास 2.20 लाख पाऊंडची ( 2,03,15,299.73 भारतीय किंमत) गाडी खरेदी केली आहे. गतवर्षीच त्याने बेंटली ही कार खरेदी केली होती. मॅक्लॅरेन खरेदीबाबत ख्रिस म्हणाला,'' यावर्षी मी 30 वर्षांचा होईन आणि मला या कारचा मनसोक्त आनंद लुटायचा आहे. तुम्हाला एकच आयुष्य मिळते आणि ते मनसोक्त जगायला हवं. वयाच्या पन्नाशीत मॅक्लॅरेन चालवताना मी किती विचित्र दिसेन आणि मला कोणी ओळखणारही नाही.'' 

ख्रिस ज्यु. ने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या नव्या कोऱ्या मॅक्लॅरेनचा व्हिडोओ पोस्ट केला आहे... 


ख्रिस ज्यु. हा ख्रिस एयुबँक आणि कॅरोन सुजॅन स्टीफन मार्टिन यांचा मुलगा. पूर्व ससेक्स येथे 18 सप्टेंबर 1989 सालचा त्याचा जन्म. वयाच्या 16 व्या वर्षी ख्रिस भावासह अमेरिकेत स्थायिक झाला. 2007 मध्ये त्याने बॉक्सिंगला सुरुवात केली. त्यानंतर त्याने सहा हौशी लढती जिंकून नेव्हाडा राज्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. हौशी बॉक्सिंग कारकिर्दीत त्याने 24 विजय मिळवले, तर केवळ 2 सामने गमावले. 

2011 मध्ये त्याने व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केली. त्याने पुढील तीन वर्षांत 18 सामने जिंकले आणि त्यातील 13 सामने प्रतिस्पर्धींना नॉक आऊट करून जिंकले. त्यानंतर त्याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये दबदबा निर्माण केला आहे.

Web Title: British boxer Chris Eubank Jr. flaunts his shiny new £220,000 McLaren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.