महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्य

By Admin | Published: July 7, 2017 01:28 AM2017-07-07T01:28:29+5:302017-07-07T01:28:29+5:30

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत

Bronze in Sanjivanivala of Maharashtra | महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्य

महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्य

googlenewsNext

भुवनेश्वर : महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत लक्ष्मणने सुवर्णपदक जिंकून आशियाई अ‍ॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. दुसरीकडे मनप्रीत कौरने गोळाफेकने सुवर्ण, विकास गौडाने थाळीफेकमध्ये कांस्य, महिलांच्या लांबउडीत व्ही. नीनाने रौप्य, तर नयन जेम्सने कांस्यपदक जिंकले.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने १६ मि. ००.२४ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून महाराष्ट्राची शान वाढविली. कॅग्रीस्थानच्या दारीया मास्लोव्हाने १५ मि. ५७.९७ से.ची वेळ नोंदवून सुवर्ण, तर यूएईच्या आलिया मोहम्मदने १५ मि. ५९.९५ से.ची वेळ नोंदवून रौप्य जिंकले.
भारताच्या मनप्रीत कौरने महिलांच्या गटात १८.२८ मीटर गोळा फेकून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित करून, आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. चीनच्या गुओ तियानविचनने १७.९१ मीटर, तर जपानच्या आयाओटाने १५.४५ मीटर गोळा फेकून अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात शेवटच्या क्षणी प्रवेश मिळालेल्या भारताच्या विकास गौडाने ६०.८१ मीटर थाळी भिरकावून कांस्यपदक जिंकले. या प्रकारात इराणच्या एअसान हदादीने ६४.५४, तर मलेशियाच्या मोहम्मद इरफानने ६०.९६ मीटर थाळी फेकून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
विकास हा या प्रकारात गेल्या दोन स्पर्धांमधील सुवर्णपदक विजेता आहे. त्याने यापूर्वी पुणे (२0१३) आणि वुहान (२0१५) या स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. दरम्यान, मुहम्मद अनस, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांनी ४00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सेमिफायनलमध्ये धडक मारून पहिला दिवस गाजवला. (वृत्तसंस्था)

ही माझ्या आयुष्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वश्रेष्ठ कामगिरी असून, मी या कामगिरीवर समाधानी आहे. १८ मीटरच्या पुढे गोळाफेक करायची इतकेच लक्ष्य मी ठेवले होते, त्यात सफल झाले.

Web Title: Bronze in Sanjivanivala of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.